April 14, 2024
Cold weather is likely to persist in Maharashtra till Mahashivratri
Home » महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता

           ‘ थंडी टिकूनच आहे ‘

उत्तर भारतातील पश्चिमी झंजावाताची साखळी टिकून असुन अजुनही उद्या एक पश्चिमी झंजावात प्रवेशणार आहे. त्यामुळे ८ मार्च महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता जाणवते. त्यानंतर मात्र किमान व कमाल तापमाने हळूहळू चढतीकडे झेपावतील असा अंदाज आहे.

विदर्भ व दक्षिण महाराष्ट्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात कमाल व किमान तापमान सध्य: काळातील सरासरी तापमानापेक्षा खाली घसरल्यामुळे पहाटेचा गारवा टिकून असुन दिवसाचा ऊबदारपणाही कमी जाणवत आहे.  विशेषतः जळगांव नाशिक मुंबई पुणे शहरातील व लगतच्या परिसरात व जिल्ह्यात पहाटेचे किमान तापमान १२-१३ ( मुंबई १९) तर दुपारचे कमाल तापमान २८-३०  डिग्री से.ग्रेड दरम्यानची असुन ती सरासरी पेक्षा २ ते ४ डिग्री से.ग्रेडने खाली आहेत.

विदर्भ व दक्षिण महाराष्ट्रात ही तापमाने सरासरी इतकी तर काही तुरळक ठिकाणी सरासरीच्या खाली जाणवत आहे.

एल- निनोच्या वर्षात व शिवाय तो अधिक तीव्रतेकडे झुकत असतांना, रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यात काही ठिकाणी पाण्याची झळ बसत असतांना ह्या थंडीपासून काहीसा दिलासाच मिळत आहे. विदर्भ वगळता महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण निवळले असुन पावसाची वा गारपीटीची शक्यता नाही. विदर्भात अजुन तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता जाणवते.

Related posts

जाणून घ्या जनावरांना कशाची होते विषबाधा

डॉ. आंबेडकर यांच्या चळवळीतील महिला

अभिनेत्री माधुरी पवारने केली अजिंक्यतारा गडाची स्वच्छता

Leave a Comment