February 22, 2024
discovery-of-vicoa-cernua Pinda concanensis by Mayur Nandikar
Home » सोनसरी, पंद अन् सह्याद्री…
संशोधन आणि तंत्रज्ञान

सोनसरी, पंद अन् सह्याद्री…

राधानगरी अभयारण्याच्या शेजारी लहानाचा मोठा होताना मी कधी वनस्पतींचं गुज जाणणारा, त्यांच बारसं घालणारा होऊन जाईन हे स्वप्नात सुद्धा पहिले न्हवते !

मयूर नंदीकर

संशोधन म्हणजे अखंड चालत राहणारी क्रिया, ज्याला अंत नाही. आणि सह्याद्रीतल्या वनस्पती म्हणजे अदभूत ज्यावर संशोधन करायचे भाग्य मला मिळते आहे म्हणून मी भाग्यवान. काही वर्षांपूर्वी घेतलेला हा वनस्पती वर्गीकरणाचा आणि नामकरणाचा वसा मी आवडीने जोपासतो आहे, लक्ष्य एकच आहे, ही वनसंपत्ती सगळ्यांपर्यंत पोहोचावी.

राधानगरी अभयारण्याच्या शेजारी लहानाचा मोठा होताना मी कधी वनस्पतींचं गुज जाणणारा, त्यांच बारसं घालणारा होऊन जाईन हे स्वप्नात सुद्धा पहिले न्हवते ! गेल्या पंधरा एक वर्षात सह्याद्रीत फिरताना अनेक वनस्पतींची ओळख झाली, डझनभर नवीन भेटल्या, अनेकांना नावं दिली. पण हे अगदीच शून्य होतं आणि मीपणा वितळून जातो जेंव्हा तुमची ओळख निकोलस डॅल्झेल अर्थात डी एल नावाच्या स्कॉटिश वनस्पती अभ्यासकांसोबत होते. त्याच्या कार्याने तुम्ही भारावून जात त्याने जन्मास घातलेल्या वनस्पतीबद्दल तुम्ही अभ्यास करू लागतात…. या अवलिया बद्दल मी निवांत बोलेन. पण यांनी हरिश्चंद्र गडावरून व कोकणातून, १८६१ मध्ये उपजलेल्या दोन प्रजातीबद्दल (सोनसरी व पंद) मात्र मला आज लिहावे वाटते कारण आजच आमचा न्यूझीलंडमधून प्रकाशित होणाऱ्या फायटोटेक्सा या नियतकालिकात या विषयीचा लेखं प्रकाशित झाला.

https://www.mapress.com/pt/article/view/phytotaxa.514.3.7

सोनसरी अर्थात Vicoa cernua ही सूर्यफुलाच्या कुळातील वनस्पती डी एल ने १८६१ मध्ये बॉम्बे फ्लोरा मध्ये प्रकाशित केली, त्याकाळात सोनसरीची एकच प्रजात नोंद होती आणि ही दुसरी तिच्या लांब पानाच्या खोडामुळे वेगळी ठरली, ज्यात फुलांची दलेही मोठी होती. नंतर ही वनस्पती भारत आणि बाजूच्या अन्य देशातूनही नोंद केली गेली. आम्ही आज तिसरी प्रजाती प्रसिद्ध करतोय, जी इतर सोनसरीपेक्षा वेगळी आहे. कारण त्याची फुले ही पसरट नाहीत आणि दले तर अगदीच लहान आहेत. आम्ही या प्रजातीला सह्याद्री सोनसरी (Vicoa sahyadrica) असे नाव दिलंय. सप्टेंबर ते डिसेंबरमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील सह्याद्री रांगात ही प्रामुख्याने सापडते.

सह्याद्रीच्या उत्तर पर्वत रांगामध्ये आढळणारी आणखी एक वनस्पती म्हणजे पंद ( Pinda concanensis), पूर्ण जगात ज्याची एकच प्रजाती ज्ञात होती. मागील वर्षी पदंच्या आणखी एका प्रजाती प्रकाशित करण्यात आली ती म्हणजे Pinda shrirangii. हरिश्चंद्र गडावरून शोधलेली ही वनस्पती १८६१ मध्ये डी एल ने शोधलेल्या Heracleum grandiflorum शी अगदीच मिळती जुळती, पण दुर्दैवाने सदोष नामकरणामुळे तिचा प्रचार पुढे झाला नाही आणि नंतर ती बहुतांश वर्षे डी एलच्या पंदचा एक भाग म्हणून ओळखली गेली.

Related posts

आरोग्यदायी बीजाचे उत्पादन करायचे की कोंड्याचे…

ग्रामीण साहित्याने एल्गार पुकारण्याची गरज

भाषेच्या चिंतेपेक्षा सर्वसमावेशक भूमिका घेण्याची गरज

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More