September 25, 2023
Get out of the dream and live the reality article by Rajendra Ghorpade
Home » स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात जगा
विश्वाचे आर्त

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात जगा

स्वप्नात राहून कधीच विकास साधता येत नाही. स्वप्नात न राहाता जागृत राहायला शिकले पाहीजे. स्वप्नात राहून पदरी निराशा पडते. साधना करतानाही स्वप्नात असता कामा नये. स्वप्न आपणास झोपेत पडते. म्हणजेच आपण जागृतावस्थेत नसतो. झोपेत असताना आपणास स्वप्ने पडतात. स्वप्न पडून नये यासाठी आपण जागृतावस्थेत असायला हवे. झोपेत असाल तर स्वप्ने पडणारच. यासाठी साधना करताना जागृतावस्थेत करायला हवी.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

जागता नरू सहसा । निद्रा पाहूनि जैसा ।
स्वप्नींचिया सोसा । वश्यु कीजे ।। 1012 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा

ओवीचा अर्थ – जागृत पुरुष जसा ( झोपेच्या आधीन झाला असता ) स्वप्नातील हावेच्या भरीस पडून सुखदुःख भोगास पात्र केला जातो.

कधीही वास्तवात राहायला शिकले पाहीजे. आजकाल मनोरंजनाची साधने, मोबाईल गेम्स अशा कृत्रिम प्रकारांमुळे माणसाचे विचारही कृत्रिम होताना पाहायला मिळत आहेत. वास्तवाचे भान यामुळे राहात नाही. मनुष्य एका विशिष्ट परिस्थितीच्या आहारी जाऊ लागला आहे. मुलांमध्येही व्यक्तिमत्त्व विकासाची प्रक्रिया मंदावताना दिसत आहे. सृष्टीचा नियम आहे. वापरात नसणाऱ्या, उपयोगात नसणाऱ्या गोष्टी नष्ट किंवा दुर्मिळ होताना पाहायला मिळतात. पण ज्याचा वापर होतो त्यातील काहीमध्ये जनुकिय बदल होतानाही पाहायला मिळतात. कृत्रिम जगात राहू तर नैसर्गिक देणगी नष्ट होऊन जाईल. हे विचारात घ्यायला हवे.

जगभरात दिवसाला अनेक नवनव्या गोष्टींचा शोध लागत आहे. तंत्रज्ञान विकास झपाट्याने होताना पाहायला मिळत आहे. दर दिवसाला काही ना काही नवे पाहायला मिळत आहे. यातून माणसाची भाषाही आता तांत्रिक झालेली दिसून येत आहे. प्रत्येक गोष्टीचे माध्यम बदलताना पाहायला मिळत आहे. संवादाचे माध्यम सुद्धा बदललेले पाहायला मिळत आहे. उदाहरणच सांगायचे तर कोरोनाने जग थांबवले खरे पण माणूस थांबला नाही. हे लक्षात घ्यायला हवे. त्याने आलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधले. म्हणजेच आपण बदलत्या परिस्थितीत वास्तवात राहायला शिकले पाहीजे तरच आपण तग धरू शकु.

अशा या बदलत्या युगात वास्तवात राहायला शिकायलाच हवे. मग ते एखादा व्यवसाय असो वा शिक्षण पद्धती असो. दैनंदिन व्यवहारात होणारे बदल हे स्विकारून बदलत्या जगाचा वेग आपणास पकडता यायला हवे. जगाचा वेध आपणास घेता आला पाहीजे. वास्तवाचे भान ठेऊन बदलत राहून विकास होतो. अन्यथा आपण मागे पडू. मागे पडून आपण एकदिवस बदलत्या युगातूनच बाहेर फेकले जाऊ. जगाचा बदल हा आपणाला स्विकारावा लागतो. यासाठी जीवनात आपण वास्तववादी असायला हवे.

स्वप्नात राहून कधीच विकास साधता येत नाही. स्वप्नात न राहाता जागृत राहायला शिकले पाहीजे. स्वप्नात राहून पदरी निराशा पडते. साधना करतानाही स्वप्नात असता कामा नये. स्वप्न आपणास झोपेत पडते. म्हणजेच आपण जागृतावस्थेत नसतो. झोपेत असताना आपणास स्वप्ने पडतात. स्वप्न पडून नये यासाठी आपण जागृतावस्थेत असायला हवे. झोपेत असाल तर स्वप्ने पडणारच. यासाठी साधना करताना जागृतावस्थेत करायला हवी.

म्हणजेच साधनेत आपले अवधान असायला हवे. साधनेत सोहमचा स्वर ऐकायला शिकले पाहीजे. तो स्वर सदैव ऐकता यायला हवा. त्या स्वरात आपण रंगून जायला हवे. जागरूक असू तरच आपणास अशी अवस्था प्राप्त होईल. स्वप्नात असू तर तो स्वर आपणास कधीच समजणार नाही. ऐकायलाही मिळणार नाही. याचा अर्थ आपणास कधीच आत्मज्ञानाची अनुभुती होणार नाही. म्हणजे आपण आत्मज्ञानाला मुकू. असे होऊ नये यासाठी स्वप्नाच्या दुनियेतून बाहेर पडून वास्तवात जगायला हवे. म्हणजेच जागरूक राहून साधना करायला हवे तरच आत्मज्ञानाचा लाभ आपणास होईल. अन्यथा आपल्या पदरी निराश पडेल.

Related posts

म्हणोनि माझां स्वरुपी । मनबुद्धि इये निक्षेपीं ।

अमरत्त्वाचे भारतीय तत्त्वज्ञान संवर्धन करणे गरजेचे

म्हणऊनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।

Leave a Comment