सांगली : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठे उद्योजक व कारखाने यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व समाजात दिवसेंदिवस वाढणारी बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्ट्रीकोनातून जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, सांगली आणि मिरज महाविद्यालय, मिरज यांच्यावतीने जिल्हास्तरीय रोजगार मेळाव्याचे आयोजन सोमवार 25 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यत केले आहे. अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज. बा. करीम यांनी दिली.
या रोजगार मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्यातील विविध नामवंत खाजगी कंपन्या सहभागी होणार असून यामध्ये प्रामुख्याने माई इंडस्ट्रीज, वेस्टर्न प्रेसिकॉस्ट प्रा.लि., कुपवाड, इस्टीम ॲपरेल सर्व्हीसेस प्रा. लि., मिरज, ओम इंडस्ट्रीज, एक्सेला पेन्सीलस लिमीटेड, महाबळ ॲटो ॲन्सील्स प्रा लि., रोटाडाईने टुल्स प्रा. लि., टायसन इंडस्ट्रीज, मिरज, जगदीश आर्यन ॲण्ड स्टील प्रा. लि., मोहन ॲटो इंडस्ट्रीज, ग्लोबल फायनान्स सोल्युशन मिरज, सुपरक्राप्ट फौन्डी युनिट नं.2, मिरज, महालक्ष्मी एचआर फसिलीटी, बालाजी ॲटो सर्व्हीसेस, सांगली, पी.एन. गाडगीळ, खारे फॅब टेक, विजेता स्वीच गेअर प्रा. लि, जुगाई आयर्न ॲण्ड स्टील प्रा. लि व टॅलेनसेटू सर्व्हीसेस प्रा.लि. पुणे इ. नामवंत कंपन्यानी सहभाग नोंदविलेला आहे. या रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 19 खाजगी नामवंत कंपन्या सहभागी होणार असुन यामध्ये १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी, बी.ई, व पदवीधर इत्यादी शैक्षणिक पात्रतेची एकूण 536 पदे भरण्यात येणार आहेत.
पात्र उमेदवारांनी hpps://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्ज करुन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी 25 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेमध्ये मिरज महाविद्यालय, शासकीय दूध संकलन केंद्र शेजारी, मिरज या कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. करीम यांनी केले आहे.