March 27, 2023
Marathi Boli Sahitya Samhelan in Danapur
Home » दानापूर येथे रविवारी मराठी बोली साहित्य संमेलन
काय चाललयं अवतीभवती

दानापूर येथे रविवारी मराठी बोली साहित्य संमेलन

  • डॉ. प्रतिमा इंगोले यांचे आजोळ असणाऱ्या दानापूर येथे आठवे मराठी बोली साहित्य संमेलन
  • ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे संमेलनाचे अध्यक्ष
  • अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन
  • मराठी बोलीवर दोन परिसंवाद व कविसंमेलनाचे आयोजन

दानापूर (ता. तेल्हारा) येथे आठवे राज्यस्तरीय मराठी बोली साहित्य संमेलन रविवारी (ता.12) होत आहे. कै. श्यामराव बापू सार्वजनिक वाचनालय, स्व. बापूसाहेब ढाकरे कला अकादमी आणि नागपूर येथील मराठी बोली साहित्य संघाच्यावतीने या संमेलनाचे आयोजन केले आहे. मराठी बोली भाषांचे संवर्धन हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती संमेलनाच्या संयोजक डॉ. प्रतिमा इंगोले यांनी दिली आहे. दानापूर हे डॉ. प्रतिमा इंगोले यांचे आजोळ आहे. त्यांच्या आईचे जन्मगाव आहे.

दानापूर येथील खोडे प्रतिष्ठानमध्ये हे संमेलन होणार असून वरोरा येथील ज्येष्ठ साहित्यिक आचार्य ना. गो. थुटे हे या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. अकोला जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन सकाळी दहा वाजता होणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून इये मराठीचिये नगरी या वेबसाईटचे संपादक राजेंद्र घोरपडे उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनामध्ये मराठीतील विविध बोली भाषांवर दोन परिसंवादाचे आयोजन केले आहे. माझ्या बोलीचे प्रमाण मराठीला योगदान या पहिल्या परिसंवादच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाळकृष्ण लळित (मालवणी) हे असून यामध्ये डॉ. काशीनाथ बऱ्हाटे (कोरकू बोली), अॅड लखनसिंह कटरे (पोवारी), डॉ. रावसाहेब काळे (वऱ्हाडी), डॉ धनराज खानोरकर (झाडी), डॉ श्रीकृष्ण काकडे (निहाली), डॉ. रमेश सूर्यवंशी (अहिराणी) हे सहभाग घेणार आहेत.

माझ्या बोलीची वैशिष्ट्ये हा दुसऱ्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ वासुदेव वले (तावडी बोली) हे असून यामध्ये देवेंद्र पुनसे (वऱ्हाडी), डॉ. जतीन मेढे (लेवा पाटिदारी), डॉ. संदीप माळी (पारपट्टी), डॉ. गजानन कोतर्लावार (मराठवाडी), डॉ संजय निंबेकर (झाडी), डॉ राज मुसणे (ढिवरी) हे सहभागी होणार आहेत.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मराठी मायबोलीचा गजर या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अमरावतीचे कृषी अधिकारी प्रमोद कुकडे हे असणार आहेत. निमंत्रितांचे बोली काव्यसंमेलन दुपारी साडेतीन वाजता होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अंजनाबाई खुणे असून वऱ्हाडी बोलीमध्ये राजा धर्माधिकारी (परतवाडा), राजू चिमणकर (अकोला), गजानन हेरोळे (अंजनगाव), श्याम ठक (अकोला), का.रा.चव्हाण (परभणी), विजय सोसे (परतवाडा), सु. पु. अढावूकर, कुशल राऊत (अडगाव), संजय कावरे (मंगरूळपीर), स्नेहा गावंडे (दानापूर) हे कविता सादर करणार आहेत. झाडी बोलीमध्ये डॉ. चंद्रकांत लेनगुरे, सु. वि. साठे, हिरामण लांजे, माधव कौरासे, डोमा कापगते, अरुण झगडकर, पंडित लोंढे हे कविता सादर करणार आहेत. तर अहिराणीमध्ये शिवाजी साळुंके, मराठवाडीमध्ये राजू मोतेवार, गोंडीमध्ये भारत चांदेकर, मालवणीमध्ये प्रभाकर देशपांडे, हलवी बोलीमध्ये सुभा, धकाते हे कविता सादर करणार आहेत.

Related posts

कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीस साने गुरुजी पुरस्कार

घटस्थापनेनिमित्त पंढरपूर विठ्ठल मंदिरात बांधलेली पुजा…

मोदी सरकार `हा` महत्वपूर्ण निर्णय घेणार का ?

Leave a Comment