June 19, 2024
Financial assistance to Krishigati Company of Pune for use of EV technology
Home » ईव्ही तंत्रज्ञानाच्या वापरासाठी पुण्याच्या कृषीगती कंपनीला आर्थिक सहाय्य
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ईव्ही तंत्रज्ञानाच्या वापरासाठी पुण्याच्या कृषीगती कंपनीला आर्थिक सहाय्य

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या (डीएसटी) अखत्यारीतील तंत्रज्ञान विकास मंडळाने (टीडीबी) आंतर सांस्कृतिक कृषीविषयक कार्यांतील ईव्ही तंत्रज्ञानाच्या वापरासाठी पुण्याच्या कृषीगती कंपनीला आर्थिक सहाय्य केले घोषित

नवी दिल्‍ली- केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या  अखत्यारीतील तंत्रज्ञान विकास मंडळाने  27 मे 2024 रोजी नवी दिल्ली येथे आंतर सांस्कृतिक कृषीविषयक कार्यांतील ईव्ही तंत्रज्ञानाच्या वापरासाठी पुण्याच्या कृषीगती या कंपनीला आर्थिक सहाय्य घोषित केले.

“आधुनिक तसेच अचूक कृषीपद्धतीसाठी अॅक्सल-लेस बहुउद्देशीय इलेक्ट्रिक वाहन” नामक प्रकल्प म्हणजे आंतरसांस्कृतिक कृषीविषयक कार्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाच्या स्वदेशीकरणाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. कृषी उद्योग क्षेत्रातील तांत्रिक प्रगतीला चालना देण्याच्या बाबतीत  या प्रकल्पामध्ये असलेल्या क्षमतेवर विश्वास दाखवत, टीडीबीने या नाविन्यपूर्ण कृषी स्टार्ट अप उद्योगासाठी आर्थिक मदत मंजूर केली आहे.

भारताच्या सर्वात पहिल्या “सेल्फ प्रोपेल्ड इलेक्ट्रिक अग्रीकॅल्चरल टूल बार” (कृषीगती इलेक्ट्रिक बुल) या हवामानाप्रती लवचिक असलेल्या कृषी यांत्रिकीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या आयपी आधारित सुविधेवर या उपक्रमाचे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न तसेच उत्पादन दुप्पट करण्यात अप्रत्यक्षरित्या योगदान देऊन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या उद्दिष्टांना मदत करणे हे या अभिनव साधनाचे उद्दिष्ट आहे.

कृषी उद्योगावर मोठा प्रभाव टाकणाऱ्या अशा प्रकारच्या वस्तूंचे उत्पादन तसेच विपणन करणे हा कृषीगती प्रकल्पाचा उद्देश आहे. सध्याच्या परिस्थितीत देशातील कोणतीही कंपनी कृषी क्षेत्रातील वापरासाठीच्या अॅक्सल-लेस बहुउद्देशीय इलेक्ट्रिक वाहनाचे उत्पादन करत नसल्याने बाजारात या तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणात गरज आहे तसेच या तंत्रज्ञानात लक्षणीय आर्थिक क्षमता देखील आहे.

Related posts

ट्रोलींग कायद्याने बंद करण्याची गरज

मोबाईल ट्राफिकचे टेन्शन !

वाराणसीत मोदींचीच जादू…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406