July 27, 2024
G-20 and eco-friendly lifestyle article by Pramila Battase
Home » जी-२० आणि पर्यावरणपूरक जीवनशैली
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जी-२० आणि पर्यावरणपूरक जीवनशैली

पर्यावरणाला मदत होईल अशा प्रकारे जगलो तर आपण त्याचे संरक्षण करू शकतो आणि भावी पिढ्यांचे भविष्य चांगले आहे याची खात्री करू शकतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात छोटे बदल करून हे करू शकतो, जसे की अक्षय ऊर्जा वापरणे, वस्तू वाया न घालवणे आणि झाडे आणि बागांची काळजी घेणे. G20 च्या निमित्ताने आपण अधिक टिकाऊ राहण्याचा प्रयत्न करू शकतो आणि या पाच पर्यावरण-अनुकूल जीवनशैलीचे अनुसरण करू शकतो.

डॉ. प्रमिला बत्तासे, उद्योजिका आणि पर्यावरणवादी

प्रत्येकांनी शाश्वत पर्यावरण जीवनशैलीचा स्वीकार केला, तर पर्यावरणाचं संरक्षण तर होईलच पण येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगले भवितव्यही देऊ शकतो. यासाठी प्रत्येकाची छोटी कृतीही महत्वाचं पाऊल ठरू शकते. आपल्या दैनंदिन आयुष्यात पर्यावरणीय जीवन पद्धतींचा अवलंब केला, तर पृथ्वीचे चांगले संरक्षण होऊ शकतं. यासाठी सर्व सामाजिकघटकांनी काही शाश्वत पर्यांयाची निवड करण्याची आवश्यकता आहे. यामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्याचा आणि जैवविविधतेच नव्हे; तर आपल्या येणाऱ्या पिढीच्या चांगल्या भवितव्यासाठीही महत्त्वाचं आहे. यासाठी अक्षय ऊर्जा, कचरा कमी करणे, जैवविविधतेला प्रोत्साहन देणे आणि निरोगी जीवनशैलीसाठी आपल्या सगळयांच्या सामूहिक प्रयत्नांची खूप गरज आहे.

G20 हा एक चांगले निमित्त आहे. यामुळे आपल्याला शाश्वत पर्यावरण जीवनशैली स्वीकारण्यासाठी, हिरव्यागार वसुंधरेसाठी आणि स्वच्छ जगासाठी प्रेरणा मिळते. यासाठी तुम्ही पर्यावरणीय शाश्वत भविष्यासाठी टाकाऊ पासून टिकाऊ पद्धतीचा अवलंब करायला हवा. यामध्ये जुन्या वापरात नसलेल्या वस्तूंवर प्रक्रिया करणे, टाकाऊ वस्तूचे सुंदर आणि कलात्मक वस्तूंमध्ये रूपांतर करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तुम्ही तुमच्या घरातील एका अडगळीत पडलेलं फर्निचर, कपडे, जुनी खेळणी आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू इत्यादी. याची योग्य विल्हेवाट लावल्यामुळे घरातील कचरा तर कमी होतो टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा निर्माण करणे हे शाश्वत जीवनशैलीतील एक महत्वाचं पाऊल ठरू शकते.

शाश्वत पर्यावरणासाठी आपल्या घरापासून आपण एक छोटीशी सुरूवात करू शकतो. आपण गावी राहत असू तर अंगणात आणि शहरात राहत असू तर टेरिसवर हिरव्यागार बागेची उभारणी करू शकतो. यामुळे शुद्ध हवा आणि ऑक्सिजन मिळण्यास मदत होते. यासाठी जैवविविधतेचं संरक्षण होईल,पर्यावरणाला फायदेशीर ठरतील अशा वनस्पतींच्या रोपांची लागवड करायला हवी. या रोपांसाठी सेंद्रिय खतांचा वापर करा. यामुळे मातीचे पोषण तर होईलच आणि पर्यावरणालाही लाभ होईल. विविध रंगी फुलांची झाडे आणि घराच्या सभोवती हिरव्यागार झाडांमुळे घराच्या सौंदर्यात भर पडते. यासोबत निसर्ग सान्निध्यात राहिल्यामुळे मन प्रसन्न राहते. तसेच पर्यावरणालाही छोटासा पण महत्त्वाचा हातभार लागू शकतो.

आपल्याकडे आजही पारंपारिक ऊर्जेचा जास्त वापर केला जातो. यामुळे ऊर्जेचा अनावश्यक वापर टाळण्यासाठी ,एलईडी दिव्यांचा वापर करावा. यामुळे कमी ऊर्जा लागते. गरज नसताना घरातील पंखे आणि लाईटचे बटण बंद करा. हेच नियम आपण शाळा, महाविद्यालयात वर्गखोल्यातून बाहेर पडताना लागू करावेत. या छोट्या छोटया कृतीमुळेही ऊर्जेची बचत होऊ शकते. यासाठी पारंपारिक मार्गाच बंद करून आधुनिक पर्यारणीय मार्गाचा अवलंब करण्यावर भर द्यायला हवा. G20 आपल्या प्रत्येकाचं छोटसं पाऊल शाश्वक पर्यावरण जगाकडे टाकलेले मोठे पाऊल ठरू शकते. तुमची प्रत्येक छोटी कृती तुम्हाला पर्यावरणावर प्रेमी बनवू शकते.

शाश्वत पर्यावरण जीवनशैलीच्या पद्धतीमध्ये आपल्यात काळानुसार बदल करायला हवा. पारंपारिक ऊर्जेच्या वापर कमी कमी करायला हवा. तसेच सौरऊर्जेच्या वापरावर भर द्यायला हवा. यासाठी स्मार्ट होम सिस्टीमचा वापर करायला हवा. संपूर्ण घराला सौरऊर्जेवर चालणाऱ्या वीजची जोडणी करायला हवी. घरातील लाईट, गिझर आणि एअर कंडिशन, कुलर आणि स्वंयपाक बनण्यासाठी सोलर पॅनलची सिस्टीम बसवून घेता येऊ शकते. तसेच शेतीला पाणी देण्यासाठी सौरऊर्जा हा चांगला पर्याय ठरू शकतो. यासाठी शासनाकडून वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून प्रोत्साहनही दिल जातं. याचा शेतकरी आणि नागरीकांनी जागरूकपणे वापर करायला हवा. यामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होईल आणि पर्यावरणाचेही संरक्षण होईल. आपल्याकडे पारंपारिक ऊर्जा स्त्रोत कमी आहेत. त्याची गरज असेल तरच वापर करायला हवा.

जर आपण सर्वांनी पर्यावरणाला मदत होईल अशा प्रकारे जगलो तर आपण त्याचे संरक्षण करू शकतो आणि भावी पिढ्यांचे भविष्य चांगले आहे याची खात्री करू शकतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात छोटे बदल करून हे करू शकतो, जसे की अक्षय ऊर्जा वापरणे, वस्तू वाया न घालवणे आणि झाडे आणि बागांची काळजी घेणे. G20 च्या निमित्ताने आपण अधिक टिकाऊ राहण्याचा प्रयत्न करू शकतो आणि या पाच पर्यावरण-अनुकूल जीवनशैलीचे अनुसरण करू शकतो. आपण जुन्या गोष्टी फेकून देण्याऐवजी नवीन आणि सुंदर वस्तूंमध्ये बदलू शकतो. या गोष्टी करून, आपण जगाला प्रत्येकासाठी एक चांगले स्थान बनवू शकतो.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Navratri Biodiversity Theme : पिवळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…

मनमंदिरात तेवणारा काव्यरुपी नंदादीप

प्रभाती सूरमनी रंगती

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading