June 7, 2023
International job fair for jobs abroad
Home » परदेशात नोकरीसाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा
काय चाललयं अवतीभवती

परदेशात नोकरीसाठी आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा

आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा: जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे

कोल्हापूर : भारतातील उमेदवारांना परदेशात नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा 21 फेब्रुवारी ते 26 मे 2023 दरम्यान एनएसडीसी मार्फत आयोजित करण्यात आला आहे. या पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/candidate/ या लिंकवर नोंदणी करुन जास्तीत-जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सं.कृ. माळी यांनी केले आहे.

रोजगार मेळाव्यात सहभाग़ी होण्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करावी, स्क्रीनिंग आणि भाषा चाचणी ऑनलाईन, ऑनलाईन मॅपिंग उमेदवार, भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फेऱ्या (मुंबई) तसेच अंतिम फेऱ्या घेण्यात येणार आहेत. उमेदवारांना काही समस्या असल्यास km@nsdcdigital.org तसेच 18001239626 / 8800055555 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. रोजगार मेळाव्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सं.कृ.माळी यांनी केले आहे.

Related posts

प्रा. भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान

समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर

फेब्रुवारीमध्ये मुंबईत जागतिक मसाले परिषद

Leave a Comment