April 20, 2024
Home » जात्यावरची ओवी ( व्हिडिओ)
मुक्त संवाद

जात्यावरची ओवी ( व्हिडिओ)

जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणत. त्यामध्येदेवता, रुढी परंपरा,  नातेसंबंध, दैनंदिन जीवनातील घडामोडी या गोष्टी बोलीभाषेत शब्दबद्ध करुन  त्यांत स्त्रि हृदयातील अनेक भावभावनांचे कल्लोळ व्यक्त होत असते.

शिल्पा मराठे

पूर्वी पहाटेच्या प्रहरी जातं मांडून त्यावर धान्य दळल्याशिवाय भाकरी मिळत नसे. त्यामुळे रोजच घरोघरी जात्याची घरघर ऐकू येत असे, आणि त्या घरघरी बरोबरच दळणाऱ्या स्त्रियांच्या मुखातून स्त्रवणाऱ्या अमृतमधुर ओव्याही ऐकायला मिळत. गाण्याने श्रम हलके होतात, म्हणून जात्यावर दळण दळताना स्त्रिया ओव्या म्हणत. त्यामध्ये देवता, रुढी परंपरा,  नातेसंबंध, दैनंदिन जीवनातील घडामोडी या गोष्टी बोलीभाषेत शब्दबद्ध करुन  त्यांत स्त्री हृदयातील अनेक भावभावनांचे कल्लोळ व्यक्त होत असत. हा भाव व्यक्त करण्यासाठी जात्यावर बसल्यावर ओवी सुचते,’ अशी म्हण मराठीत प्रचारात आलेली आहे.
जात्यावर दळणं हे कालबाह्य झालं तरी अजून काही ठिकाणी क्वचित जात्यावर दळताना दिसून येते. जाते जरी त्याचे बोल गात असले तरी घरीण मात्र अबोल झाली हे जाणवते. हल्लीच्या स्रियांना पूर्वीच्या ओव्या माहीत नाहीत. असाच एका गावात गेलेलो असताना जात्यावरचं दळण दळताना बघण्याचा दुर्मिळ योग जुळून आला.आणि तो चित्रित करण्याचा मोह आवरला नाही. या चित्रिकरणाला मग नंतर ओव्यांची साथ देवून आपल्या समोर सादर केला आहे. अवश्य पहा.
(ओवी गायन – सौ. शिल्पा मराठे)

जात्यावरची ओवी

Related posts

बदलत्या ग्रामसंस्कृतीचा भीषण चेहरा दाखविणारी कादंबरी – “चारीमेरा”

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात पाण्यासाठी कोणत्या तरतुदी हव्यात ?

नव्या शब्दकळेनं नटलेल्या ग्रामीण कथा

Leave a Comment