छत्रपत्री शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांमधील हा एक नितांत सुंदर किल्ला आहे. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले आहेत. तरीही या किल्ल्याचा आणि चंदगड तालुक्यातील इतर चारपाच किल्ल्यांचा अभ्यास प्रतिक्षेतच आहे.
नंदकुमार मोरे,
मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
हा आहे किल्ले काळानंदीगड. याचे मूळ नाव शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी बदलून कलानिधी असे सांगितले. वास्तविक काळानंदीगड हे जनसामान्यात रुजलेले नाव. या गडाचा इतिहास अभ्यासाअभावी अद्याप फारसा समोर आलेला नाही. छत्रपत्री शिवरायांनी बांधलेल्या अनेक किल्ल्यांमधील हा एक नितांत सुंदर किल्ला आहे. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा वावर असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध झाले आहेत. तरीही या किल्ल्याचा आणि चंदगड तालुक्यातील इतर चारपाच किल्ल्यांचा अभ्यास प्रतिक्षेतच आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला पश्चिमेकडील बाजूस गोव्याच्या वाटेवर असलेला हा अतिशय देखणा किल्ला. समुद्रसपाटीपासून सुमारे ३३२९ फुट उंचीवर असलेला मराठ्यांच्या इतिहासाचा हा अलक्षित साक्षीदार. सिंधुदुर्ग आणि गोमंतकात जाणार्या घाटवाटांवर नजर ठेवण्यासाठी बांधलेला हा किल्ला खरोखरच पाहरेकरी वाटतो. चंदगडच्या कानाकोपर्यातून तो दिसतो.
कदाचित आपल्या इतिहासाचा धाक देत हा किल्ला उभा असावा. या किल्ल्याच्या पायथ्यापासून रामघाटकडे जाणारा जुना रस्ता होता. तत्कालीन काळात रामघाट हा सर्वात महत्त्वाचा व्यापारी मार्ग. अनेक युरोपियन व्यापारी, पोर्तुगीज, ब्रिटिशांनी या व्यापारी मार्गाचा वारंवार उल्लेख केला आहे. हा मार्ग सध्या बंद आहे. परंतु, मार्गावर काही मजबूत बांधकामे, पाण्याचे हौद, घोड्यांचे तळ, बैल आणि इतर जनावरांच्या विश्रांतीच्या जागा आजही दाखवता येतात. काही ठिकाणी मनुष्य वस्ती असल्याच्या खुणा आणि प्रार्थनेसाठी बांधलेला चर्चही आहे. हा गड चंदगड तालुक्यातील जवळजवळ प्रत्येक गावातून आपले दर्शन देतो. गडावरून चंदगडचे कीर्र जंगल दिसते. ते डोळ्याचे पारणे फेडणारे दृष्य गडावरून पाहण्यात जी गंमत आहे, ती सांगण्यात नाही.











Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.