April 19, 2024
Khapali wheat cultivation article by Krushik app
Home » खपली गव्हाची लागवड करायची आहे, मग हे वाचाच…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खपली गव्हाची लागवड करायची आहे, मग हे वाचाच…

गहू पिक सल्ला – खपली गहू लागवड

खपली गव्हास साधारण १०-२३ अंश सेल्सिअस तापमान योग्य आहे. तापमान थोडे वाढले तरी खपली गहू ते सहन करू शकतो. तसेच पाण्याचा ताणदेखील सहन करू शकते. खपली गहू काळ्या, कसदार जमिनीत चांगला येतो. चांगल्या निचर्‍याच्या जमिनीची निवड करावी. मातीचा सामू ६ ते ८ दरम्यान असावा.

खरिपाचे पीक निघाल्यावर जमिनीची चांगली मशागत करावी. उन्हाळ्यात शेणखत टाकले नसल्यास एकरी ४ टन शेणखत मिसळावे. २४ किलो नत्र, २४ किलो स्फुरद, १६ किलो पालाश पेरताना द्यावे. उर्वरित २४ किलो नत्र पेरणीनंतर ३० दिवसांनी खुरपणीनंतर द्यावे. बियाणे म्हणून वापरताना खपली गहू टरफलासहीत वापरला जातो. एक एकर पेरणीसाठी ४० किलो बियाणे वापरावे. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी एकरी १६ ते २० किलो बियाणे पुरेसे होते.

पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम बुरशीनाशकाची ३ ग्रॅम प्रतिकिलो याप्रमाणे प्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी ॲझोटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणू संवर्धकाची प्रत्येकी २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे बीजप्रक्रिया गुळाच्या द्रावणाबरोबर करावी. बियाणे सावलीमध्ये सुकवून पेरणी करावी. पेरणीसाठी दोन ओळींत २० सें.मी. अंतर ठेवून पाभरीने किंवा पेरणी यंत्राच्या साह्याने एकसारखे बी पडेल याची दक्षता घ्यावी. शक्‍यतो पेरणी दक्षिणोत्तर तसेच ५ ते ६ सें.मी. खोल करावी. पेरणी उभी-आडवी अशी दोन्हीबाजूने न करता एकेरी करावी.

✨सुधारित जाती

आघारकर संशोधन संस्था, पुणे: एमएसीएस-२९७१
धारवाड कृषी विद्यापीठ, कर्नाटक: डीडीके-१०२५, डीडीके-१०२९
प्रादेशिक संशोधन केंद्र, वेलिंग्टन, तामिळनाडू: एचडब्लू-१०९८

सौजन्य – कृषिक अॅप

Related posts

राज्यस्तरीय डोंगरी साहित्य पुरस्कार जाहीर

पाऊस – ओल्याचिंब पावसाचा बहुरंगी प्रवास

मोहाची पोळी (मोहाची पुरणपोळी) – विदर्भाची खाद्यसंस्कृती

Leave a Comment