April 1, 2023
Manachi palakhi poem by Vilas Kulkarni
Home » मनाची पालखी…
कविता

मनाची पालखी…

विलास कुलकर्णी यांची कविता

मनाची पालखी l आपणच भोई l
जगभर नेई l निमिषात l

पालखीत आले l परिवार मुले l
विस्मरण झाले l विठ्ठलाचे l

अचपळ मन l  खोटी मोह माया  l
काया गेली वाया l विकारात l

अज्ञानी पामर l नाहीं ब्रह्मज्ञान l
जिणे नामाविन l व्यर्थ भासे l

आप्पा म्हणे नित्य  l संसारी राहून l
करावे स्मरण l श्रीहरीचे l

विलास कुलकर्णी (आप्पा )
मीरा रोड

Related posts

लोकगीत – भेट

कोणता हंगाम हा…

तू…आणि….मी

Leave a Comment