पुणेः महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेच्यावतीने कादंबरी, कथा, ललित, कविता, बालसाहित्य या साहित्य प्रकारात उत्कृष्ट साहित्य पुरस्कार व लक्षवेधी साहित्य पुरस्कार असे दोन पुरस्कार दिले जाणार आहेत.
उत्कृष्ट साहित्य पुरस्कारासाठी ४००० रुपये, तर लक्षवेधी साहित्य पुरस्कारासाठी २५०० रुपये तसेच मसापचे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी यासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन मसापच्या पिंपरी चिंचवड शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत प्रकाशित झालेली पुस्तके ग्राह्य धरण्यात येतील. यासाठी लेखकाने आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती पाठवाव्यात. तसेच पुस्तकासोबतच्या अर्जावर नाव, पुर्ण पत्ता व दूरध्वनी क्रमांक स्पष्ट अक्षरात लिहावा. पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याची अंतिम तारीख 30 जानेवारी २०२४ अशी आहे.
पुस्तके पाठविण्यासाठी पत्ता: मसाप पिंपरी चिंचवड, द्वारा प्राची कुलकर्णी, प्लॉट नं ६६, सेक्टर २५ , सिंधूनगर, प्राधिकरण, निगडी, पुणे ४११०४४ दूरध्वनी: ९९७५५६१२७६
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
1 comment
Pdf पाठवली तर चालेल का?