
दत्तात्रय गिर रामगिर गोसावी यांचा 1997 मध्ये “कमलाई” हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच कालचक्र, विचार ज्योत, शतदल, कारगिल काव्य – संध्या, पंचरंगी कविता या महाराष्ट्रतील पाच कविंचे प्रातिनिधीक कविता संग्रह यामध्ये गोसावी यांच्या कविता प्रकाशित झाल्या आहेत.
मला जन्म मिळाला मुक्ताई
खेळतो सोपान संसार घाई।
निवृत्ती धडे दिधले ज्ञानाई
ओवी मोक्षपटाची पुण्याई।।धृ।।
वीस गुणेला वीस इंचाई
पन्नास घरे ती चौकोनाई।
पहिले घर माझ्या जन्माई
अखेरचे ते घर मोक्षपटाई ।।१।।
सहा कवड्या मज दिधली ती
पालथ्या पडल्या की दान येती।
काम क्रोध माया ये मजला ती
लोभ मोह मद मत्सर ये भरती।।२।।
ही षडरिंपूची कामे साप तोंडी
मध्ये आयुष्य टप्प्यावर शिडी।
शिडी चढणे सत्संग द् या शांती
सद्बुद्धी दिधली नि मनशांती।।३।।
ज्ञानियाचा राजा दावी हा बोध
तेराव्या शतकाचा असे हा शोध।
चांगले संस्काराचे पेरले ते बीज
मोक्ष तत्वज्ञान शोधले महाबीज।।४।।
अजुनही खेळतो आपण सापशिडी
कधी सापतोंडी तर घेतो उडी।
या चार भावंडांचे हे युग उतराई
मोक्षपट खेळा, मिळे मुक्ती बाई ।।५।।
कवी – द. रा. गोसावी.
“कमलाई”, आनंद नगर ८९, घाटपुरी, खामगाव.
ता. खामगाव जि. बुलढाणा
पिन कोड:-४४४३०३
1 comment
सुंदर कविता