– खरीप विपणन हंगामात सुमारे 18.17 लाख शेतकऱ्यांना रु. 57,032.03 कोटी रुपये मूल्याच्या किमान हमीभावाचा लाभ
– 290.98 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी
2021-22 च्या खरीप विपणन हंगामात तांदळाच्या खरेदीची प्रक्रिया गेल्या वर्षाप्रमाणेच सुरळीतपणे सुरू आहे. या हंगामात 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत महाराष्ट्र, चंदीगड, गुजरात, हरयाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तेलंगण, राजस्थान, केरळ, तमिळनाडू, बिहार, ओरिसाआणि आंध्र प्रदेश या राज्यातून/केंद्रशासित प्रदेशांमधून 290.98 लाख मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली आहे.
आतापर्यंत 18.17 लाख शेतकऱ्यांना रु.57,032.03 कोटी मूल्याच्या किमान हमीभावाचा लाभ मिळाला आहे.
सध्या सुरू असलेल्या खरीप विपणन हंगामात पंजाबमधून सर्वाधिक((18685532मेट्रिक टन) खरेदी करण्यात आली, त्याखालोखाल हरयाणा (5530596 मेट्रिक टन) आणि उत्तर प्रदेशमधून (1242593 मेट्रिक टन) खरेदी करण्यात आली. इतर राज्यांमध्येही खरेदी प्रक्रियेला वेग आला आहे. महाराष्ट्रात 3886 शेतकऱ्यांकडून 16,988 मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना 33.30 कोटी रुपये मूल्याच्या किमान हमीभावाचा लाभ मिळाला आहे. गेल्या हंगामात महाराष्ट्रात 6,24,292 शेतकऱ्यांकडून 18,85,038 मेट्रिक टन तांदळाची खरेदी करण्यात आली होती. त्यामुळे या शेतकऱ्यांना 3558.95 कोटी रुपये मूल्याच्या हमीभावाचा लाभ मिळाला होता.
2020-21 च्या खरीप विपणन हंगामात किमान 1,31,13,417 शेतकऱ्यांना 168823.23 कोटी रुपये मूल्याच्या किमान हमीभावाचा लाभ( 30.11.2021 पर्यंत) मिळाला होता आणि 89419081 मेट्रिक टनांची खरेदी झाली होती.
तांदळाच्या खरेदीत 2021-22 या वर्षात सर्वाधिक लाभ हा पंजाबमधील शेतकऱ्यांना झाला आहे. पंजाबमध्ये सुमारे 9 लाख 24 हजार 299 शेतकऱ्यांना लाभ झाला. गेल्यावर्षी पंजाबमध्ये १० लाख 57 हजार 674 शेतकऱ्यांना लाभ झाला होता.
2021- 22 या हंगामात तुलनेत सर्वाधिक लाभ झालेली राज्ये
तेलंगाना – 2 लाख 27 हजार 939
हरियाणा – 2 लाख 99 हजार 777
उत्तर प्रदेश – 1 लाख 66 हजार 620
2020- 21 या हंगामात तुलनेत सर्वाधिक लाभ झालेली राज्ये
तेलंगाना – 21 लाख 64 हजार 354
छत्तीसगड – 20 लाख 53 हजार490
हरियाणा – 5 लाख 49 हजार 466
उत्तर प्रदेश – 10 लाख 22 हजार 286