September 25, 2023
Padmashree To Amiya Mahaling Karnataka Farmer
Home » कल्पक शेतकऱ्याचा पद्मश्री 2022 ने सन्मान
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कल्पक शेतकऱ्याचा पद्मश्री 2022 ने सन्मान

आयसीएआर-सीसीएआरआय ने नामनिर्देशित केलेल्या कर्नाटकच्या किनारी जिल्ह्यातल्या कल्पक शेतकऱ्याचा पद्मश्री 2022 ने सन्मान…

कर्नाटकच्या किनारी दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या अद्यनाडका गावातले कल्पक शेतकरी अमाई महालिंग नाईक यांना भारत सरकारच्या पद्मश्री 2022 ने सन्मानित करण्यात आले. डोंगर उतारावरच्या कोरड्या जमिनीचे कल्पकतेने झिरो एनर्जी अर्थात शून्य उर्जा सूक्ष्म सिंचन प्रणालीच्या माध्यमातून सुपीक शेतात रुपांतर केल्याच्या त्यांच्या कामगिरीची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. आयसीएआर-सीसीएआरआय  म्हणजे भारतीय कृषी संशोधन संस्था- केंद्रीय किनारी कृषी संशोधन संस्था, गोवा यांच्या संचालकानी, दोन संशोधकांचा समावेश असलेले एक पथक स्थापन केले. या पथकाने या शेतकऱ्याची भेट घेऊन, उत्तम दर्जाच्या छायाचित्राद्वारे त्याच्या तंत्रज्ञानाचे दस्तावेजीकरण करत पद्म पुरस्कार 2022 साठी त्याचे नामनिर्देशन करणारा अर्ज तयार केला.

अमाई महालिंग नाईक यांनी, आपल्या शेतात पाणी आणण्यासाठी,  एकहाती 315 फुट लांबीचे सहा बोगदे खणले. पाणी पाझरण्यासाठी त्यांनी शेताभोवती 300 चर खणले. त्यासाठी त्यांनी सुमारे  5000 मोठे लॅटराइट दगडही त्यांनी स्वतःच वाहून आणले. त्यांनी दोन संरक्षक बांध ( 15 फुट लांब, 30 फुट रुंद आणि 5 फुट उंच ) आणि  12, 000 लिटर क्षमतेचा हौदही बांधला. 300 पोफळी, 75 माड, 150 काजूची झाडे, केळीची 200 रोपे आणि मिरीचे वेल यांची लागवड करत त्यांनी ओसाड जमिनीचे नंदनवन  केले. याशिवाय त्यांनी मधु मक्षिका पालन केले  आणि गायींना पोषक आहार म्हणून अझोला निर्माण केला.

स्व बळावर केलेल्या  या प्रयत्नाने त्यांनी ‘एकांडा शिलेदार’ आणि ‘टनेल मॅन’ म्हणून नाव लौकिक प्राप्त केला. नाईक यांचे शेत म्हणजे प्रत्येकाने आवर्जून पाहावे असे आदर्श शेत ठरले असून वर्षाला, परदेशी पर्यटकासह 1000 पेक्षा जास्त जणांनी इथे भेट दिली आहे. पद्मश्री मिळाल्याची बातमी ऐकताच, आपले कठोर परिश्रम आणि कल्पकता यांची दखल घेतल्याबद्दल  त्यांनी आयसीएआर-सीसीएआरआय गोवा आणि भारत सरकार यांचे आभार मानले.

Related posts

अभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…

वनस्पतीमधील लोह कमतरतेबाबत…

गझल मंथन पुरस्कारासाठी गझलसंग्रह पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment