April 27, 2025
Arun Paudwal Memorial Award announced to Thyagaraj Khadilkar
Home » अरुण पौडवाल स्मृति गौरव पुरस्कार त्यागराज खाडिलकर यांना जाहीर
मनोरंजन

अरुण पौडवाल स्मृति गौरव पुरस्कार त्यागराज खाडिलकर यांना जाहीर

  • अरुण पौडवाल स्मृति कृतज्ञता गौरव पुरस्कार 2024 गायक – संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना जाहीर
  • २ जून रोजी सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते मुंबईत होणार प्रदान !

मुंबई: सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा “कृतज्ञता गौरव पुरस्कार” यंदा सुप्रसिद्ध गायक, सूत्र संचालक व संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे हे २७ वे वर्ष आहे. येत्या रविवार दिनांक २ जून रोजी संध्याकाळी ७ :०० वाजता, सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल यांच्या शुभहस्ते व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा होईल.

यावेळी “स्वरकुल ट्रस्ट”तर्फे सादर झालेल्या “तिमीरातुनी तेजाकडे” या अंध दिव्यांग कलाकारांनी गायलेल्या अल्बम मधील २ गायकांना देखील अनुराधा यांच्या हस्ते प्रत्येकी ११ हजारांची धनराशी देऊन सन्मानित करण्यात येईल. हा सोहळा अनुराधा पोडवाल यांचे खार (पश्चिम) येथील निवासस्थानी होणार आहे.

स्व.अरुण पौडवाल स्मृति कृतज्ञता गौरव पुरस्काराने सन्मानित झालेले मान्यवर असे –

संगीतकार राम कदम, पार्श्वगायक जी. मल्लेश, संगीतकार यशवंत देव, प्रभाकर जोग, दत्ता डावजेकर, अशोक पत्की, संगीत संयोजक श्यामराव कांबळे, तालवादक जयसिंग भोई, प्रमोद साने, संतूर वादक उल्हास बापट, गीतकार जगदीश खेबुडकर, शांताराम नांदगावकर, वंदना विटणकर, भावगीत गायक अरुण दाते, गिटार वादक रमेश अय्यर, सुनील कौशिक, ध्वनिमुद्रक डी.ओ.भन्साळी, अविनंदन टागोर, हेमंत पारकर, सत्येन पौडवाल, युवा गायक गिरीश संझगिरी, चंद्रशेखर महामुनी, मदन काजळे…

#त्यागराज खाडिलकर यांचा परिचय –

१) थोर स्वातंत्र्य सैनिक, झुंजार पत्रकार, ‘केसरी’ व ‘नवाकाळ’चे संपादक, लोकप्रिय नाटककार नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे पणतू.
२) हिंदी ‘सारेगमप’चा विजेता
३) ४५ मराठी, हिंदी चित्रपटात पार्श्वगायन. सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी, राम लक्ष्मण, श्रीधर फडके, दत्ता डावजेकर, अशोक पत्की, अनील मोहिले, अवधूत गुप्ते, अजय अतुल अशा अनेक प्रतिभावंत संगीतकारांसाठी पार्श्वगायन
४) ‘जाऊ तिथे खाऊ’, ‘लबाड कुठली’, ‘गुलदस्ता’ अशा १२ सुपरहिट चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन.
५) ‘आरोही’, ‘टिकल ते पोलिटिकल’, ‘नमन नटवरा’, ‘ट्रिक्स मिक्स रिमिक्स’, ‘M2G2’, ‘हास्य महाल’ अशा विविध वाहिन्यांवरील कार्यक्रमांचे सूत्र संचालन.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!