📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
October 26, 2026
काय चाललयं अवतीभवती

माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा

माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्त खानापूर येथे ३० सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा

खानापुर – माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या ३५ व्या पुण्यतिथीनिमित्त संपतराव माने महाविद्यालय, खानापूर येथे मंगळवार ३० सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक विजेत्यांना ५०००/- रोख रक्कम, सन्मानपत्र व ट्रॉफी, द्वितीय क्रमांक विजेत्यांना ३०००/- रोख रक्कम, सन्मानपत्र व ट्रॉफी, तृतीय क्रमांक क्रमांक विजेत्यांना २०००/- रोख रक्कम, सन्मानपत्र व ट्रॉफी व उत्तेजनार्थ क्रमांक विजेत्यांना १०००/- रोख रक्कम, सन्मानपत्र व ट्रॉफी अशी बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. जहॉगिर मुलाणी यांनी केले आहे.

तसेच बुधवार १ ऑक्टोबर रोजी पुण्यतिथीचा कार्यक्रम सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे माजी चेअरमन प्राचार्य, डॉ. सिकंदर जमादार व सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक अमोल बाबर यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती शिक्षण प्रसारक संस्था खानापूरचे अध्यक्ष राजकुमार (दादा) माने यांनी दिली.

Related posts

लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीचे पुरस्कार जाहीर

महावितरण डबघाईस…!

धार्मिक उन्मादी राजकारणाला साहित्यिकांचेही प्रोत्साहन

Leave a Comment

Leave a review

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406