June 19, 2024
Shivaji Maharaj Mandir Yadwad Karnataka
Home » यादवाड येथे आहे शिवाजी महाराज यांचे मंदिर
व्हिडिओ

यादवाड येथे आहे शिवाजी महाराज यांचे मंदिर

यादवाड येथे आहे शिवाजी महाराज यांचे मंदिर

  • मल्लाबाई देसाई यांनी कर्नाटकातील यादवाड येथे उभारले आहे शिवाजी महाराज यांचे मंदिर.
  • बेळगाव धारवाड मार्गावर आयआयटी संस्थेच्या पुढे असणाऱ्या नरेंद्र फाट्यावरून साडे बारा किलोमीटरवर यादवाड हे गाव वसले आहे.
  • यादवाड येथील हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूला छोट्या मंदिरात शिवाजी महाराज यांचे हे शिल्प आहे.
  • मल्लाबाई हिने हे शिल्प शिवाजी महाराज यांच्या दिलादारपणाची साक्ष म्हणून तयार केले आहे.
  • सुमारे चार फुट उंचीचे हे शिल्प दोन भागात विभागले आहे
  • पहिला वरच्या भागात कोरीव खांब, पोपट आणि लतावेलींची सुंदर महिरप कोरली आहे. यातच शिवाजी महाराज यांचेअश्वारुढ शिल्प आहे
  • खालच्या भागात महाराज आसनावर बसलेले आहेत. त्यांच्या मांडीवर एक मुल आहे. समोर मल्लाबाई वाटी घेऊन उभ्या आहेत. या प्रसंगात एक सैनिक पाण्याची सुरई घेऊन समोरील बाजूस उभा आहे. महाराजांच्या मागे एक धनुर्धारी स्त्री सैनिक उभा आहे यावरून मल्लाबाईच्या सैन्यदलात स्त्री सैनिक असावेत असे स्पष्ट होते.

Related posts

आत्मज्ञानी संतांचा अनुग्रह हवा

काळानुसार बदलती आव्हाने पेलण्यास आजची स्त्री सक्षम – वृषाली पाटील

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406