April 30, 2025
Shivbal Kishor Yuva Marathi Sahitya Samhelan Dr Shrikant Patil President
Home » शिव बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील
काय चाललयं अवतीभवती

शिव बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील

पहिले राज्यस्तरीय शिव बाल-किशोर युवा मराठी साहित्य संमेलन मुक्ताईनगर येथे होणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर उद्घाटक डॉ. सतीश तराळ हे असणार आहेत.

मुक्ताईनगर येथील शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनतर्फे पहिले राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. रविवारी ( ता. १३ फेब्रुवारी २०२२) आदिशक्ती संत मुक्ताईनगरीत हे संमेलन होणार आहे, अशी माहिती संमेलनाचे मुख्य आयोजक फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी दिली आहे.

या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा राज्य शासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक कोल्हापूर येथील डॉ. श्रीकांत पाटील यांची निवड केली आहे. त्यांनी बाल कुमारांसाठी कथा, कादंबरी, काव्य व एकांकिका लेखनाचे महत्वाचे कार्य केलेले आहे. ज्येष्ठांसाठी लॉकडाउन काळामध्ये त्यांची लोकडाउन ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. या काळामध्ये सकारात्मक संदेश देणारी ही पहिली कादंबरी ठरली. ही कादंबरी मराठी सोबतच इंग्रजी, हिंदी भाषेमध्ये सुद्धा प्रकाशित झाली आहे. हा लेखकाचा गौरवच म्हणावा लागेल.

तसेच पश्चिम महाराष्ट्रातील ऊस प्रश्नावर डॉ. पाटील यांची ऊसकोंडी ही कादंबरी सुद्धा प्रकाशित झाली आहे. या कादंबरीला डॉ. सदानंद देशमुख यांनी पाठराखण केलेली आहे. डॉ. पाटील हे एक उत्तम वक्ते सुद्धा आहेत. त्यांची सातशेहून अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांना आत्तापर्यंत ५० हून अधिक पुरस्कारांनी गौरवलेले आहे. २५ हून अधिक साहित्य संमेलनात परिसंवादामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे.

संमेलनाचे उद्घाटक अमरावती येथील ज्येष्ठ विचारवंत, साहित्यिक, समीक्षक तथा उस्मानाबाद येथील ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कथाकथनाचे अध्यक्ष डॉ. सतीश तराळ यांची निवड केली आहे. त्यांनी वाचन, लेखन, संशोधन, प्रबोधन व समिक्षण, पत्रकार समाजसेवक त्याच प्रमाणे उत्कृष्ट वक्ता म्हणून नावलौकिक मिळवला आहे. डॉ. तराळ यांचा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासह विविध प्रवाही साहित्य संमेलनामध्ये विक्रमी सहभाग राहिलेला आहे. राज्यातील विविध संस्थांनी त्यांना सन्मानाचे पुरस्कार देऊन गौरवांकित केले आहे.

विदर्भ साहित्य संघाचा सरचिटणीस म्हणून व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळांमध्ये संपादक गुरुदेव मासिकाचे संपादक म्हणून डॉ. तराळ यांचे नेत्रदीपक कार्य आहे. त्यांचे साहित्य विविध विद्यापीठांतील अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेले आहे.

या संमेलनाचे कथाकथनाचे अध्यक्ष म्हणून कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक डॉ. चंद्रकांत निकाडे तर परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून औरंगाबाद येथील साहित्यिक डॉ. सुभाष बागल तर कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून अकोला येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा समीक्षक तुळशीराम बोबडे यांची निवड केली आहे.

या संमेलनाचे कार्यवाहक फाऊंडेशनचे सचिव साहित्यिक प्रमोद पिवटे, सहकार्यवाह जळगाव जिल्हा दक्षता समितीचे प्रमुख प्रा. डॉ. अजय पाटील व जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया संयोजक जिल्हा संघटक हकीम आर. चौधरी, सहसंयोजक बुलढाणा जिल्हा दक्षता समिती प्रमुख मनोहर पवार, निमंत्रक कार्यकारी सदस्य तथा ग्रामीण लेखक निंबाजी हिवरकर हे आहेत.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading