श्रावण रिमझिम श्रावण सरीत राया मला भिजवा प्रेमाच्या हिंदोळ्यावर अलगद तुम्ही झुलवा भुरुभुरू वाऱ्यावर आता लता लागली डोलू सुगंध पसरला चोहीकडे कळी लागली फुलू श्रावणी मोगरा फुलला रात्र आजची जागवा प्रेमाच्या हिंदोळ्यावर अलगद तुम्ही झुलवा भिजली सातारची मैना पंख लागले फडफडू गूज मनीचे राघुचे ऐकून गगनात पहाते उडू शृंगाराची रीत आगळी चोचीने चोच भरवा प्रेमाच्या हिंदोळ्यावर अलगद तुम्ही झुलवा आंब्याच्या फांद्यावर बांधा नवा कोरा झोका अलगद येऊन मागून गुपचूप लोचन झाका तनात शिरशिरी हवा श्रावण करा हो हिरवा प्रेमाच्या हिंदोळ्यावर अलगद तुम्ही झुलवा विलास कुलकर्णी मीरा रोड

Home » श्रावण
previous post
next post