March 30, 2023
Shrishabda Kavya Puraskar
Home » ‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन
काय चाललयं अवतीभवती

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

‘श्रीशब्द ‘ काव्य पुरस्कारासाठी आवाहन

कै.सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृति प्रित्यर्थ गेली काही वर्षे कवितासंग्रहाला ‘श्रीशब्द ‘ पुरस्कार दिले जातात. याहीवर्षी असे पुरस्कार दिले जाणार आहेत. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम 1100 रुपये, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र असे आहे. स्फूर्ती साहित्य संघाच्यावतीने नेज (ता. हातकणंगले) येथे समारंभपूर्वक पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.

यासाठी १ जानेवारी, २०२२ ते ३१ डिसेंबर,२०२२ या कालावधीत प्रकाशित कवितासंग्रहाची एक प्रत कवींनी अथवा प्रकाशकांनी १० एप्रिल २०२३ पर्यंत पाठवावेत, असे आवाहन संघाचे उपाध्यक्ष सुभाष पाटील यांनी केले आहे.

यंदा दोन्ही वर्षाचे पुरस्कार एकत्र दिले जाणार आहेत. गतवर्षीचा निकाल यापूर्वीच जाहीर झाला आहे. फक्त २०२२ सालाची पुस्तके पाठवावीत. पुस्तके कवी चंद्रकांत पोतदार, मु. पो. मजरे कारवे, ता. चंदगड, जि.कोल्हापूर 416507. मोबाईल – 9423286479 या पत्त्यावर १० एप्रिलपूर्वी पाठवावीत.

Related posts

दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या अध्यक्षपदी भीमराव धुळुबुळू

गजनृत्य…

शेतीचा शोध स्त्रीने लावला ! – सुनिताराजे पवार

Leave a Comment