February 29, 2024
snakebite-in-animals Care and Remedies
Home » जनावरांतील सर्पदंश : काळजी व उपाय
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जनावरांतील सर्पदंश : काळजी व उपाय

सापाच्या जाती :

जगात 2500 पेक्षा जास्त जाती आहेत. त्यापैकी फक्त 1/3 साप विषारी आहेत. 1. नाग, 2. मण्यार, 3. घोणस, 4. फुरसे, 5. नागराज इत्यादी विषारी जातींचा समावेश होतो.

सापा बद्दलचे गैरसमज:

1.   साप दुध पितो: हे खरे नाही कारण सापाचे मुख्य खाद्य उंदीर, बेडुक व पक्षांची अंडी, टोळ, मासे पाल इत्यादी आहेत. महत्वाचे म्हणजे साप हा प्राणी मांसाहारी आहे.

2.   सापाला ऐकु येते: सापाला कान नसतात. त्यामुळे त्यांना ऐकू येण्याचा प्रश्नच नाही. सापाला विभागलेल्या जिभेच्या सहायाने ध्वनीकंपनाची जाणीव होत असते. सापवाल्याच्या पुंगीच्या हालचालीनुसार सराप हालचाल करत असतो.

3.   साप खुन्नस धरतो: सापाच्या मेंदुची संपुर्ण वाढ होत नसल्यामुळे साप हुशार नसतो. त्यामुळे तो मृत्यूपर्यंत खुन्नस धरतो हे चुकीचे आहे व तसे फक्त सिनेमातुनच दाखविले जाते.

विषारी व बिनविषारी साप कसा ओळखावा

बिनविषारी साप

1. पाठीवरील खवले लहान असतात.
2. पोटावरील खवले लाबट असतात ते पुर्ण लांबीपर्यंत असतात.
3. डोक्यावरील खवले लहान असतात.
4. उदा. धामण, अजगर, आंधळा, पाणसाप सर्पटोली व गवत्या साप

विषारी साप

1. फणा काढण्याची क्षमता असते. फण्यावर 10 असा आकडा असतो.
2. मानेवर 2 ते 3 पट्टे असतात.
3. घोणस सापाचे तोंड इंग्रजी व्ही शब्दाच्या आकाराचे असते.
4. विषारी सापाची उदाहरणे नाग, नागराज, घोणस.

जनावरातील सर्पदंशाची लक्षणे

 • सर्पदंशाचा परिणाम हा सापाच्या जातीवर आणि आकारमानाशी निगडीत असतो. तसेच चावा घेतलेल्या जनावराच्या कातडीची जाडी आणि त्वचेखाली असणाऱ्या चरबीवर अवलंबुन असते.
 • दंश झालेल्या ठिकाणी दाताच्या खुणा दिसतात व दाताच्या व्रणातुन रक्तस्त्राव होतो.
 • दंश झालेल्या ठिकाणी आग होवुन सुज येते.
 • जनावर बेचैन होऊन पाय झटकते. तीन पायांवर उभे राहते इ. लक्षणे दिसतात.
 • जनावरांच्या तोंडातुन लाळ गळते व तोंडतुन अर्धवट चावलेला चारा बाहेर पडतो. जिभेला लकवा बसतो.
 • डोळ्याच्या पापणीला सुज येते, डोळे उघडेच असतात परंतु पापण्या बारीक होत जातात.
 • दोन तीन तासानंतर श्वसन कमी होऊन श्वसनात अडथळा निर्माण होतो व जनावर बेशुध्द पडते व मृत्यू होतो.
 • जनावराचे शरीर थंड पडते.
 • मण्यार सर्पदंशाच्या ठिकाणी सुज येत नाही आग होत नाही परंतु जनावरांना चक्कर येते व जनावरे खाली पडतात. श्वास व हृदयाचे ठोके  वाढुन जनावरांचा मृत्यू होतो. साप शक्यतो जनावरांना पाय, तोंड व काही वेळेला कासेला व शेपटीला चावतो.

सर्पदंशावर प्रथमोपाचर

 • दंश झालेल्या जागेच्या वरच्या बाजुला  कपडा, दोरी, रुमाल, रबराची पट्टी, कंबरेचा दोरा, गळ्यातील दोर यांनी घट्ट बांधावे.
 • दंश झालेल्या ठिकाणी तिक्ष्ण हत्याराने चिरावे. चिर कापताना ती जखम 1 सें.मी. पेक्षा जास्त टाकण्याकरता शोषक पंप किंवा रबराचा ड्रापर इ.  वापर करावा.
 • रक्त शोषुन झाल्यानंतर जखम स्वच्छ पाण्याने धुवावी त्यानंतर पोटॅशियम परमॅगनेटचे द्रावण टाकवे.
 • त्यानंतर जनावरे पशुवैद्यक डॉक्टरांना दाखवावीत.

हे प्रथमोपचार मानवाला सर्पदंश झाल्यास पण करावेत.

उपचार पॉल्हिॅलंट ॲटोस्नेक व्हेनम सिरम हे इंजेक्शन शिरेतुन जनावरांच्या वजनाप्रमाणे द्यावे

 • 5 ते 10 मिली दंश झालेल्या जखमेच्या आजुबाजुला द्यावे
 • औषधासोबत डेक्सोना, बिटामिथॅझोन इ. औषधे द्यावीत.
 • इतर रोगांची बाधा होऊ नये म्हणुन प्रतिजैविकांची इंजेक्शन द्यावीत
 • धनुर्वात होऊ नये म्हणुन ॲटोटिटॅनस टॉक्साइड द्यावे

याप्रमाणे सर्पदंशावर प्रथमोपचार व उपचार करुन घेतल्यास सर्पदंशामुळे जनावरांतील मृत्यूचे प्रमाणे कमी होईल.

 

Related posts

धकाधकीच्या जीवनात आत्मबोधाचे ज्ञान उपयुक्त

टकटक

लोकमान्यांचे समृद्ध भारताचे स्वप्न साकार करू : पंतप्रधान मोदी

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More