February 29, 2024
The current condition of cold will continue till January 26
Home » थंडीची सध्याची स्थिती २६ जानेवारीपर्यंत कायम
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

थंडीची सध्याची स्थिती २६ जानेवारीपर्यंत कायम

मुंबईसह कोकण व विदर्भ वगळता महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे , सातारा तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना ह्या ११ जिल्ह्यात  सध्या १९ ते २३ जानेवारी पर्यन्तच्या पुढील ५ दिवसात पहाटेचे किमान तापमान हे १० ते १२ अंश सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने कमी दरम्यानचे असु शकतात

मुंबईसह कोकणात सध्या १९ ते २३ जानेवारी पर्यन्तच्या पुढील ५ दिवसात पहाटेचे किमान तापमान हे १४ अंश सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान २६ अंश सेल्सिअस म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने कमी दरम्यानचे असु शकतात. दक्षिण कोकणात कमाल तापमान  वाढ ही एखाद्या अंशाने अधिक असेल.

विदर्भ व मराठवाड्यातील उर्वरित जिल्ह्यात सध्या १९ ते २३ जानेवारी पर्यन्तच्या पुढील ५ दिवसात पहाटेचे किमान तापमान हे १४ ते १६ अंश सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस म्हणजे ही दोन्हीही तापमाने सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या अंशाने अधिक दरम्यानचे असू शकतात.

विदर्भात २३  जानेवारी नंतर ३ दिवसासाठी म्हणजे २५ जानेवारी पर्यन्त ढगाळ वातावरण राहून थंडी काहीशी कमी होईल. अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अन्यथा नाही.

Related posts

संन्यास कशाचा अन् कशासाठी करायचा ? 

भारतातल्या ‘ऐतिहासिक वारसा’ पर्यटन स्थळांविषयी जगाला आकर्षण

‘अर्जिया शरदचंद्रजी’ चा शोध लावणाऱ्या संशोधकांचा गौरव

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More