July 27, 2024
Fauna Census in Sagareshwar Sanctuary
Home » सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना

सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना

सांगली : कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत सागरेश्वर अभयारण्यात 22 मे (बुध्द पौर्णिमा) रोजी अभयारण्यातील 8 पाणस्थळावर प्राणीगणना कार्यक्रम घेण्यात आला. या प्राणीगणना कार्यक्रमात 14 वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह 8 प्रगणकांनी (स्वयंसेवक) सहभाग घेतला.

वन्यजीव विभागामार्फत दरवर्षी मे महिन्यामध्ये बुध्द पौर्णिमेच्या दिवशी सागरेश्वर अभयारण्यात (सांगली जिल्हा) प्राणीगणना कार्यक्रम घेतला जातो. प्राणीगणना कार्यक्रमामध्ये निसर्गप्रेमिंना एक दिवस जंगलात राहण्याचा तसेच प्राण्यांचे दर्शन, आवाज, वनसंपदा व जैवविविधतेचा अनुभव मिळत असल्याने दरवर्षी प्राणीगणना कार्यक्रमास उदंड प्रतिसाद मिळतो. यातून जनसामान्यांना वन्यप्राणी व जंगलामध्ये वनविभागामार्फत करण्यात येत असलेली कामे, वनसंपदा टिकविण्यासाठी वनविभागाकडून करण्यात येत असलेले प्रयत्न याची जवळून माहिती होते. त्यांच्याकरिता या दिवसाचा अनुभव कायम स्मरणात राहणारा असतो.

वन्यजीव विभागामार्फत राबविण्यात आलेल्या प्राणी गणना कार्यक्रमात मुंगूस – 1, माकड – 71, रानडुक्कर – 28, चितळ -171, ससा – 4, सांबर – 220, साळिंदर – 7, मोर – 11, कोल्हा – 5 आणि घोरपड- 5 या प्राण्यांचे प्राणीगणना प्रसंगी दर्शन झाल्याची माहिती कोल्हापूर विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) एस. एस. पवार यांनी दिली आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

साहित्य निर्मितीची शंभरी …!

अध्यात्माच्या महासागराचा हवा अभ्यास

पाऊस जुलै महिन्यातला

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading