डॉ. यशपाल भिंगे (नांदेड), डॉ. मोना चिमोटे (अमरावती), शिवाजीराव चाळक (चाळकवाडी), गोविंद काळे ( सोलापूर), डॉ. रवींद्र श्रावस्ती(सांगली), डॉ. भास्कर बडे (लातूर), ज्योती सोनवणे (औरंगाबाद), संजय चौधरी (नाशिक), डॉ. स्मिता पाटील, (मोहोळ) यांना पुरस्कार
औरंगाबाद -मुक्त सृजन साहित्य पत्रिका, औरंगाबाद यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या २०२१ च्या उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती राज्यस्तरीय पुरस्कारांची घोषणा मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे संपादक डॉ. महेश खरात व सहसंपादक डॉ. रामकिशन दहिफळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
या वर्षी नांदेड येथील सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. यशपाल भिंगे यांच्या नरहर कुरुंदकरांचा कादंबरी विचार या ग्रंथास 5000 रूपयाचा कै. ज्ञानोबा बापू काळे मुक्त सृजन लक्षणीय ग्रंथ स्मृती पुरस्कार दिला आहे.
उत्कृष्ट ललितगद्यासाठी अमरावती येथील डॉ. मोना चिमोटे यांच्या पळसबंद या ललितगद्याला 2500 रुपयाचा कै. नारायणराव दहिफळे मुक्त सृजन ललितगद्य स्मृती पुरस्कार दिला आहे. उत्कृष्ट बालवाङ्मयासाठी चाळकवाडी येथील शिवाजी चाळक यांच्या उंदराचा टांगा या बाल कवितासंग्रहास 2500 रुपयाचा स्व. मातोश्री कंथाबाई व स्व. रेव्ह. एल.बी. सोनावणे मुक्त सृजन स्मृती पुरस्कार दिला आहे.
उत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार सोलापूर येथील गोविंद काळे यांच्या ‘महायोध्दा’ या कादंबरीला 2500रु पयाचा पेरियार (ई.व्ही.रामसामी नायकर) मुक्त सृजन कादंबरी पुरस्कार दिला आहे.
उत्कृष्ट समीक्षेसाठीचा 2500 रुपयाचा महात्मा जोतीराव फुले वैचारिक लेखक व समीक्षक मुक्त सृजन पुरस्कार सांगली येथील डॉ. रवींद्र श्रावस्ती यांच्या शोध संत रविदासांचा या ग्रंथाला दिला आहे.
उत्कृष्ट कथासंग्रहास 2500 रुपयाचा आद्यकथाकार चक्रधर स्वामी मुक्त सृजन कथा पुरस्कार लातूर येथील डॉ. भास्कर बडे यांच्या बाईचा दगड व औरंगाबाद येथील ज्योती सोनवणे यांच्या दमकोंडी ‘कथासंग्रहाला विभागून देण्यात आला आहे.
उत्कृष्ट कवितासंग्रहाचा 2500 रुपयाचा मुक्त सृजन वालाई काव्य पुरस्कार नाशिक येथील संजय चौधरी यांच्या आतल्या विस्तवाच्या कविता व मोहोळ येथील स्मिता पाटील यांच्या नाही गिरवता येत कुठली लिपी या कवितासंग्रहास विभागून देण्यात आला. स्मृतिचिन्ह , प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या पुरस्काराच्या निवडीचे काम डॉ. किसन माने (सांगोला) डॉ. संतोष देशमुख (औरंगाबाद )व कवयित्री प्रिया धारूरकर (औरंगाबाद) यांनी केले आहे. गेल्या तीन वर्षापासून साहित्य पत्रिकेच्या वतीने पुरस्कार दिले जातात. पुरस्कारांचे वितरण 11 सप्टेंबर 2022 रोजी पणजी गोवा या ठिकाणी होणाऱ्या पहिल्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनात होणार आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.