July 27, 2024
Submit a proposal for the Tambe-Raymane Young Researcher Fellowship
Home » तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी प्रस्ताव पाठवा
काय चाललयं अवतीभवती

तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी प्रस्ताव पाठवा

साधना साप्ताहिकाच्यावतीने तांबे-रायमाने युवा संशोधक अभ्यासवृत्तीसाठी अर्ज व प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ फेब्रुवारी २०२४ असून विविध विषयावरील संशोधनासाठी ही अभ्यासवृत्ती देण्यात येणार आहे.

अभ्यासवृत्ती कोणाला आणि कशासाठी ?

२९ फेब्रुवारी २०२४ पूर्वी ज्यांचे वय ३५ वर्षे वा त्यापेक्षा कमी आहे ते तरुण या अभ्यासवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. एकूण पाच तरुण-तरुणींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची अभ्यासवृत्ती दिली जाणार आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या सहा महिन्यांत एका विशिष्ट विषयावर अभ्यास करून तो अभ्यास लिखित वा ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात सादर करणे आवश्यक आहे.

अभ्यासवृत्तीतून झालेले अभ्यास कुठे प्रसिद्ध होणार ?

लिखित स्वरूपात असेल तर ५ ते १० हजार शब्दांचा मजकूर आणि दृकश्राव्य असेल तर अर्धा एक तासाच्या कालावधीचे ऑडिओ / व्हिडिओ, या अभ्यासवृत्तीतून सादर करणे अपेक्षित आहे. हे सर्व अभ्यास त्या-त्या विषयांचे स्वरूप लक्षात घेऊन साधना साप्ताहिकात किंवा कर्तव्य साधना डिजिटल पोर्टलवरून प्रसिद्ध केले जाईल.

अभ्यासवृत्ती कोणत्या विषयावरील संशोधनासाठी ?

शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, स्त्री-पुरुष विषमता, भटके-विमुक्त, आदिवासी, मुस्लिम समाज सुधारणा, सामाजिक चळवळी व आंदोलने, बदलते ग्रामीण वास्तव, रोजगार, शेती आणि शेतकरी, शासकीय योजनांची अंमलबजावणी इत्यादी विषयांतील कोणतेही एक लहान युनिट घेऊन अभ्यास व फिल्ड व्हिजीट यांवर आधारित रिपोर्ताज वा दीर्घ लेख तयार करणे अपेक्षित आहे. अर्थातच, हे लेखन व सादरीकरण उत्तम दर्जाचे असणे अपेक्षित आहे, कारण मोठ्या समूहाला ते उपलब्ध करून द्यायचे आहे.

अभ्यासवृत्तीची कार्यवाही कशी होईल?

२९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत आलेल्या अर्जांची छाननी करून त्यातील उत्तम असतील ते अर्ज त्यासोबतच्या टिपणांसह त्या-त्या विषयांच्या तज्ज्ञांकडे पाठवले जातील. गरज वाटल्यास अंतिम फेरीतील अर्जदारांच्या मुलाखती प्रत्यक्ष किंवा ऑनलाईन घेतल्या जातील. अंतिम निवड झालेल्या पाच तरुण-तरुणींची नावे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केली जातील आणि अभ्यासवृत्तीचा पाहिला हप्ता दिला जाईल. त्यानंतर प्रत्येक महिन्यात झालेल्या अभ्यासाचा आढावा घेऊन पुढील हप्ता दिला जाईल. जानेवारी २०२५ मध्ये ते अभ्यास-संशोधन साधनात किंवा कर्तव्यवरून प्रसिद्ध होतील.

अभ्यासवृत्तीसाठी अर्ज व प्रस्ताव कसा पाठवायचा?

अर्जदाराने स्वतःचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता (इ-मेल व फोन नंबरसह), शिक्षण, जन्मतारीख, नोकरी/व्यवसाय करीत असल्यास कुठे व कधीपासून, यापूर्वी केलेले अभ्यास/संशोधन/लेखन हे सर्व तपशील एक ते दोन पानांत बसतील अशा पद्धतीने टाईप करून घ्यावेत. सोबत, कोणत्या एका लहान घटकावर, का व कसा अभ्यास करण्याची इच्छा आहे, हे सांगणारा पाचशे ते हजार शब्दांपर्यतचा प्रस्ताव जोडावा. २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत अर्ज आणि त्यासोबतचा प्रस्ताव मेलद्वारे वा पोस्टाने साधना साप्ताहिकाच्या कार्यालयीन पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –
https://weeklysadhana.in/
संपादक, साधना साप्ताहिक, 431, शनिवार पेठ, पुणे 411030
अधिक माहितीसाठी संपर्क – 7028257757
weeklysadhana@gmail


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

कार्तिक एकादशीनिमित्त विठ्ठलाचे शिल्प…

नवीन वर्ष…

आधार प्रतिष्ठानचे साहित्य पुरस्कार जाहीर

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading