February 29, 2024
Hey Rajya Shivaji Satpute poem in Gophangunda
Home » हे राज्य..
कविता

हे राज्य..

गोफणगुंडा

हे राज्य विकून खायचे की
फुंकून टाकायचे
गुलाम झालेल्यांनी
गुजरातला नेऊन ठेवायचे

हे राज्य कायद्याचे
की काय द्यायचे ?
एकमेकांचे खिसेकापू
लुटणारांच्या फायद्यांचे

राज्य खातंय गोते
खालती कधी वरती
जसे ईव्हीएम
तशीच तलाठी भरती

हे राज्य खोक्यांचे
तरंगणाऱ्या फुग्यांचे
जो जे लुटेल
वायदे घोटाळे तयांचे

हे राज्य गोलमाल
चोरलुटारू वस्त्यांचे
टोळी उधाणल्या
दमबाज कुस्त्यांचे

Related posts

पापणी…

हरिश्चंद्राची फॅक्टरीः झाडीबोली साहित्य चळवळ समृद्ध करणाऱ्या जीवनयोध्याचा प्रवास

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे सोन्याच्या तस्करी करणारी साखळी डीआरआयकडून उध्वस्त

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More