July 27, 2024
Try fed will Give GI To Trible Community Products
Home » ट्रायफेड देणार आदिवासींच्या 177 उत्पादनांना भौगोलिक मानांकन
काय चाललयं अवतीभवती

ट्रायफेड देणार आदिवासींच्या 177 उत्पादनांना भौगोलिक मानांकन

नवी दिल्‍लीः काही सर्वाधिक अनोख्या कलाकृतींच्या निर्मितीच्या बाबतीत भारतातील आदिवासींकडे असलेली पारंपारीक कलेतील पारंगतता जपण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित म्हणजेच ट्रायफेडने जीआय टॅग म्हणजेच भौगोलिक मानांकन मिळवून देण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे.  

आदिवासी स्रोत असलेल्या विविध उत्पादनांना भौगोलिक मानांकन मिळवून विक्री करणे या माध्यमातून विशिष्ठ भौगोलिक वैशिष्ठ्ये असलेल्या कृषीमाल, नैसर्गीक उत्पादने वा संबधित प्रदेशाची वैशिष्ट्ये  असणारी मानवनिर्मित उत्पादने यांचे महत्व जपण्यासाठी व वृद्धींगत करण्यासाठी ट्रायफेड  कटीबध्द असेल. यामुळे अविश्वसनीय भारतातील समृद्ध खजिना जपला जाईल.  याबाबतीत जागतिक पातळीवर पुढाकार नोंदवत  उच्चायुक्त कार्यालयात आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादितच्या सहकार्याने आत्मनिर्भर भारत कक्ष तयार करण्यात आला आहे.  भारतभरातील आदिवासीं शतकानुशतके तयार करत असलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळवून देण्याचा उद्देश यामागे आहे.

सध्या ट्रायफेडने आदिवासीकडून निर्मित  वा निर्मितीत अदिवासींचा सहभाग असलेल्या भारतीय मानांकन अर्ज केलेल्या तीनशेंहून जास्त उत्पादनांपैकी भौगोलिक मानांकनप्राप्त 56 उत्पादनांचे विपणन त्यांच्या 141 भारतीय आदिवासी विक्री केंद्रांच्या जाळ्यामार्फत तसेच इकॉमर्स मंचावरून सुरू केले आहे.  

याशिवाय, देशभरातील अनेक राज्यांमधून असलेल्या स्थानिक कार्यालयातून आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित म्हणजेच ट्रायफेड 177 उत्पादनांना भौगोलिक मानांकन देण्यावर काम करत आहे. यातील 10 उत्पादने  महाराष्ट्रात आहेत.

भौगोलिक मानांकनाचे अंगिकारलेले हे उद्दिष्ट आजादी का अमृतमहोत्सव म्हणजेच भारत@75 तसेच वोकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत  या पंतप्रधानांच्या आवाहनाशी सुसंगत आहे.

भौगोलिक मानांकन कल्पनेला मजबूती देण्यासाठीचे उपक्रम

TRIFED – PMO – LBSNAA

आदिवासी उगमस्थळ असलेल्या उत्पादनांना चालना व त्यांचे विपणन  तसेच त्यांचा ब्रॅण्ड होऊन त्यामार्फत आदिवासी कलाकारांचे सक्षमीकरण होण्यासाठी आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादितने पंतप्रधान कार्यालयाशी भागीदारी केली आहे.  

ट्रायफेड – नाबार्ड

आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डने अश्या वस्तूंच्या विनियोगतून उपलब्ध होणाऱ्या संसाधनांना सामायिक करत भौगोलिक मानांकनाला वेग व बळकटी देण्याच्या दिशेने हातमिळवणी केली आहे.

ट्रायफेड – परराष्ट्र व्यवहार मंत्रालय

ट्रायफेड म्हणजेच आदिवासी सहकारी विपणन विकास महासंघ मर्यादित आणि परराष्ट्र मंत्रालयाने एकत्र येत समृद्ध आदिवासी संस्कृती आणि परंपरा यांना भारतीय वकिलातींच्या माध्यमातून वैश्विक व्यासपीठ मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. अनेक अनोख्या आदिवासी उत्पादनांना प्रोत्साहन व त्यांचे विपणन करण्याच्या दृष्टीकोनातून ट्रायफेडने ओटावा, कुवैत, बँकॉक, क्रोएशिया या ठिकाणच्या भारतीय वकिलातीत ‘आत्मनिर्भर कक्ष ’ सजविला आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

आठवणी साठवलेली उन्हाळ्याची सुट्टी

मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश, पण मान्सून आला म्हणजे काय ?

मानवता धर्माची गरज

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading