May 23, 2024
Review of Lavkumar Mule Poetry Book
मुक्त संवाद

भावगर्भ, अर्थगर्भ, चिंतनशील कवितासंग्रह

माणसासोबत माणूस जोडा आणि आपल्या ओठात नेहमी गोड शब्द विरघळून ठेवा. हे शब्द धनच आयुष्याची शिदोरी असते. असा सल्ला देत गोड घास कवी लवकुमार मुळे आपल्या कवितेतून भरवतांना दिसतात.
विलास ठोसर

अकोट

कवीचेच्या विश्वात प्रत्येक कवी आपली अशी आगळी वेगळी छाप सोडत असतो. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात .त्या अनुभवानां प्रतिभेशी संगत करत तो शब्दांचा सहवासात रमत जावून उत्तमत्तोम रचनांना आकार देत असतो …माय मातीशी घट्ट नाळ जुळलेला कवी आपल्या शब्दांना कवितेत बोलक करत असतो…

अशाच सभोवतालच्या परिस्थितीशी जवळीक साधून जुळवून घेणाऱ्या भावगर्भ, अर्थगर्भ, चिंतनशील कविता ह्या संग्रहात आहेत…लवकुमार मुळे हे तसे मुळचे शेगावचे, त्यांची कर्मभूमी जत जिल्हा सांगली आहे. आपली नोकरी पेशा सांभाळत शालेय जीवनापासून त्यांनी कविता लिहिण्याचा छंद जोपासला आहे अन् तो आजही अविरत सुरू आहे. या आधी त्यांचे पाच संग्रह प्रकाशित झाले आहेत कवीने पिंजून घ्यावा भोवताल हा लवकुमार यांचा सहावा संग्रह…

खोल मनाच्या दरीत शब्दांना साठवत भोवतालच्या परिस्थितीबद्दल त्यांनी ह्या संग्रहात अनेक कविंताना न्याय दिला आहे. आपल्या अनुभव विश्वातून त्यांच्या पानगळ, खोल मनाच्या तळाशी, होरपळ, सांज, लिपी, कविता, सपान अशा अनेक आस्वादक कविता उदयास आल्या आहेत.

“दोन्ही पायाच्या अंगठ्यांनी
काटवर धरून माय
थापत असते ‘भाकरी ‘
पोराबांळांसाठी….
” तीच धरती, तीच आकाश
झोपडी मात्र नामशेष…”
“स्वप्न जगण्याचे अंग
वेदनेचा जड संग
भोग सरता भणंग
जगण्याचा उडे रंग…”
अशा आशयघन कविता ह्या संग्रहात काळजाला हेलकावे देतांना दिसतात.

तसेच…
” खोल मनाच्या तळाशी
प्राक्तनाची गाणी
मनात साचलेले
नितळ नितळ पाणी…”
“पांघरूण हिरवी शाल
सृष्टी होते गर्द,
श्रावण सडा टाकतो
पाऊस बेधूंद…”
मरगळ झटकून हिरवळ मनात ओलवा निर्माण करावा. असा महत्त्वपूर्ण संदेश आपल्या कवितेतून देतांना कवी दिसतात…
“आयुष्याला यावी
माणसाचे जगणेच जणू
भविष्याची ग्वाही…”
“कशी गावी सांगा तुम्हीच
उंच आभाळाची गाणी…!”
” लिहित नाही कधी वेदनेची नुसती गाणी
वाजवतो शंख कधी सूर कधी बेसूर…
अशा भोवतालच्या दुःख ,वेदना ते आपल्या कवितेत मांडतात तेव्हा त्यांचे शब्द मनाला चटका लावून जातात…

” जन्मभराच लेणं
आनंदाच जगणं
आयुष्य समृद्धीच
अनुभव संपन्न गावं…”
ग्रामसंस्कृतीत वेगाने स्थीतंतरे आलीत भाऊ भावाचा वैरी होतांना दिसतो .शेताचा धुरा कोरतांना दिसतो. नात्यात खटास आली ..ती मिठास पुन्हा निर्माण व्हावी असा मोलाचा संदेश देत ते आपल्या कवितामधून प्रामाणिक पणे आशावाद पेरतात …

माणसासोबत माणूस जोडा आणि आपल्या ओठात नेहमी गोड शब्द विरघळून ठेवा. हे शब्द धनच आयुष्याची शिदोरी असते. असा सल्ला देत गोड घास ते आपल्या कवितेतून भरवतांना दिसतात.

पुस्तकाचे नाव – कवीने पिंजून घ्यावा भोवताल
कविचे नाव – लवकुमार मुळे

Related posts

शिवपूर्व कालीन महाराष्ट्र…

बाल मनात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे बीज रूजवणारी कादंबरी

उन्हाची काहिली वाढणार ! ‘मान्सून वेळेआधी पोहोचणार

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406