एसटी कामगारांचा संप एका अस्वस्थ वळणावर पोहोचला आहे. ७३ वर्षांच्या प्रवासात एसटीपुढे अनेक अडथळे आले, परंतु त्यावर मात करून ही लाल परी अव्याहतपणे धावत राहिली. धोरणकर्त्यांच्या धरसोड वृत्तीने आजवर अनेकदा खेळखंडोबा केला. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष गब्बर होत जाताना एसटी मात्र खंगत गेली. राज्य सरकारला कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेत एसटीला वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि एसटीलाही व्यावसायिक दृष्टिकोन अवलंबावा लागेल. दोन्हींचा समन्वय साधूनच पुढे जावे लागेल. अव्यवहार्य मागण्या जशा हिताच्या नाहीत, त्याचप्रमाणे सरकारी बेपर्वाईसुद्धा समर्थनीय नाही.
विजय चोरमारे

Home » लालपरीचा लाल डबा कोणी केला ?
previous post
next post