पुणेः येथील अमरेन्द्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे बालसाहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कथा, कविता, कादंबरी, एकंकिका व इतर विभागातील प्राप्त झालेल्या पुस्तकांमधून परिक्षकांनी ही निवड केली आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजन लाखे आणि कार्यवाह डॉ. दिलीप गरूड यांनी दिली आहे.
मराठी बालसाहित्य पुरस्कारांचे वितरण गुरुवारी (ता. २५ मे ) सकाळी १० वाजता टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. गीताली टिळक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. शुक्रवार पेठेतील महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती सभागृहामध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.
पुरस्कारासाठी निवड झालेले साहित्यिक असे –
कादंबरी –
सावित्री जगदाळे (सातारा) – जंगलवाट
कथासंग्रह –
संजय गोरडे (नाशिक) – कोवळे कोंब
समाधान शिकेतोड (धाराशिव) – जादुई जंगल
विज्ञान
सिद्धेश्वर म्हेत्रे (सोलापूर) – अभिनव विज्ञान प्रयोग
चरित्र
रघुराज मेटकरी (सांगली) – डॉ. नागनाथ अण्णा नायकवडी
एकांकिका
रमेश कोटस्थाने (पुणे) – रंग माझा वेगळा
कविता संग्रह
शिवाजी चाळक (जुन्नर) – अंगत पंगत
वीरभद्र मिरेवाड (नांदेड) – आनंदाची फुलबाग
विद्यार्थी वाङ्मय
पूर्व प्राथमिक शाळा, (तिवरे, कणकवली) – प्रतिनिधीक काव्यसंग्रह