May 26, 2024
Zhadiboli Sahitya Mandal State Level award
Home » झाडीबोली साहित्य मंडळांचे राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार घोषित
काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली साहित्य मंडळांचे राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार घोषित

झाडीबोली साहित्य मंडळांचे राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार घोषित

भारत सातपुते (लातुर), संदीप धावडे (वर्धा ) यांचा गौरव

झाडीबोली साहित्य मंडळ शाखा जुनासुर्ला (ता. मुल ) द्वारा देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी निवड झालेल्या साहित्यकृतीची यादी घोषित करण्यात आलेली आहे. डॉ. हरिश्चंद्र बोरकर साहित्य सेवा पुरस्कार भारत सातपुते (लातुर) यांना ; झाडीपट्टीची बहिणाबाई अंजनाबाई खूणे काव्य पुरस्कार संदीप धावडे (वर्धा) यांच्या परिवलन – परिभ्रमण या ग्रंथास जाहीर करण्यात आला आहे.

डॉ. राजन जयस्वाल समीक्षण पुरस्कार डॉ. राजेंद्र राऊत (अमरावती) यांच्या लिळाचरित्रातील कथारूपे या ग्रंथास ; अॅड.लखनसिंह कटरे भाषा संशोधन पुरस्कार डॉ. सुरेश देशमुख (अमरावती) यांच्या भोयरी मराठी शब्द कोष आणि भाषा विज्ञान या ग्रंथास; डॉ. हेमकृष्ण कापगते वैचारिक लेखन पुरस्कार मधुकर कोटनाके (राजुरा) यांच्या कोलामगुड्याची शिक्षण यात्रा या ग्रंथास; हिरामण लांजे बालकथा पुरस्कार कु. तनिष्का डांगे ( पुसद ) यांच्या जादूची झप्पी या पुस्तकास, द. सा. बोरकर स्मृति कथा पुरस्कार डॉ. अनंता सूर (मुकूटबन) यांच्या भोगवाटा या ग्रंथास ; डॉ. घनश्याम डोंगरे स्मृति कादंबरी पुरस्कार रसुल सोलापूरे (कोल्हापूर) यांच्या फाटलेलं आभाळ या ग्रंथास; विठ्ठल लांजेवार स्मृति बालकाव्य पुरस्कार एकनाथ आव्हाड (मुंबई) यांच्या शब्दांची नवलाई या ग्रंथास; वा.चं. ठाकरे स्मृति संकीर्ण ग्रंथ पुरस्कार सुरेंद्र बुराडे ( नागपूर )यांच्या केल्याने देशाटन या ग्रंथास; बापुराव टोंगे स्मृती आत्मकथन पुरस्कार यवनाश्व गेडकर ( चंद्रपूर ) यांच्या आणि असा मी घडत गेलो या ग्रंथास जाहीर करण्यात आले आहे.

या साहित्य पुरस्काराचे वितरण झाडीबोली साहित्य संमेलन जुनासुर्ला (ता. मुल ) येथे १२ मार्च (शनिवार) रोजी मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. विशेष पुरस्कार म्हणून झाडीपट्टी कलायात्री पुरस्कार हिरालाल पेंटर यांना, झाडीपट्टी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार गौरव मर्लेवार यांना, झाडीबोली ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार सुधाकर मारगोनवार (आष्टी) यांना, झाडी बोली उत्कृष्ट ग्राफिक्सकार पुरस्कार रामकृष्ण चनकापुरे ( घाटकुळ ) यांना, झाडीबोली युवा कार्यकर्ता पुरस्कार कुंजीराम गोंधळे ( मुर्झा ) यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पुरस्कारासाठी राज्यभरातून १४७ गंथ आले होते. त्यातून उत्तम साहित्यकृतीची निवड करण्यात आली आहे. निवड समितीचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, झाडीबोली साहित्य मंडळांचे जिल्हा प्रमुख कवी अरुण झगडकर, जुनासुर्ला शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण खोब्रागडे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष रंजीत समर्थ, कार्याध्यक्ष गणेश खोब्रागडे ,सहकार्याध्यक्ष खुशाल टेकाम आदींनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts

महाराष्ट्राची दुर्गपंढरी – एक विक्रम वारी

मानसिक आरोग्यासाठी विपश्यना उपयुक्त

जगण्याचे भान देणारा बालकवितासंग्रह

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406