December 4, 2022
Punavchee rat poem by sabana mastar
Home » पुनवची रात…..
कविता

पुनवची रात…..

पुनवची रात.....

पुनवेत न्हाली..
रात ओली..
हिरव्या सपनांची
प्रीत कशी जडली..
काळी ठिक्कर ती कशी
टिपूस चांदव्याला गं भुलली..
पिटूर चांदण्याच्या कुशीत
हळूच शिरली...
ओटीत तिच्या
होती गं पिकं-वेली निजली...
रात पुनवेची होती सजली..

- कवि सबना...

Related posts

गुरु पौर्णिमा

‘स्पर्श’ चारोळी संग्रहातून संवेदनशील मनाचे दर्शन

कोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून…

Leave a Comment