January 27, 2023
Chandrachi Aarti poem by Anjali Madhav Deshpande
Home » चंद्राची आरती…
कविता

चंद्राची आरती…

कवितेचे नाव:चंद्राची आरती.

जयदेव जयदेव जय रजनीनाथा,
तिमीराच्या प्रहरी प्रकाश देता,
जयदेव..॥धृ॥

पोर्णिमेला तुम्हीं पूर्णत्वा येता,
अमावस्येला लुप्त पावता,
जयदेव..॥१॥

गणेश चतुर्थीस तुम्हां पाहता,
कोप पावूनी शाप त्वा देता,
जयदेव..॥२॥

कोजागिरीला पावन करिता,
केशर दुधाचा प्रसाद देता,
जयदेव..॥३॥

शांत शीतल रोहिणी नाथा,
चांदण्यांसंगे क्रिडा करीता,
जयदेव..॥४॥

प्रसन्न वदनी शोभे शुभ्र तेजता,
भ्रमण करण्यानिघे सूर्याचा भ्राता,
जयदेव..॥५॥

सौ.अंजली माधव देशपांडे.नाशिक.

Related posts

लढायचे आहे बेरोजगारीशी…

स्त्री जाणिवेचा अस्वस्थ पदर

शब्दाची मर्यादा

Leave a Comment