वर्धा – येथील यशवंतराव दाते संस्थेचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. या पुरस्कारांचे वितरण मार्च महिन्यात मान्यवर साहित्यिकाच्या उपस्थितीत वर्धा येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. शेख हाशम व सचिव संजय इंगळे तिगावकर यांनी दिली आहे.
मराठीतील स्त्रीवादी साहित्य व चळवळीला प्राधान्य देणाऱ्या साहित्याकृतीस संस्थे मार्फत “अंजनाबाई इंगळे स्त्रीवादी साहित्य पुरस्कार” दिला जातो. २०२० – २१ चा पुरस्कार संभाजीनगर येथील डॉ. दादा गोरे ह्यांच्या ‘स्त्रियांचे समकालीन साहित्य ‘ या पुस्तकास तर २०२२ चा पुरस्कार डॉ. सुनीता सावरकर ह्यांच्या ‘ढोर चांभार स्त्रियांच्या आंबेडकरी जाणिवांचा परीघ’ या पुस्तकास जाहीर झाला आहे. तसेच २०२३ चा पुरस्कार मेहकर येथील किरण डोंगरदिवे यांच्या ‘काव्य प्रदेशातील स्त्री’ या पुस्तकास जाहीर झाला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रोख, मानपत्र व स्मृतीचिन्ह असे आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्र व बृहन महाराष्ट्रातील नामांकित प्रकाशन गृह व प्रतिथयश लेखकांकडून प्राप्त साहित्य कृतीतून उत्कृष्ट पुस्तकाची निवड केली जाते, असे निमंत्रक डॉ . राजेंद्र मुंढे यांनी सांगितले.
किरण डोंगरदिवे यांना आत्तापर्यंत काव्यप्रदेशातील स्त्री ह्या त्यांच्या बहुचर्चित ग्रंथाला विदर्भ साहित्य संघाचा कुसुमानिल, बहुजन साहित्य संघ, बापूसाहेब ठाकरे स्मृती पुरस्कार, जयराम गायकवाड स्मृती समीक्षा, सुर्यकांता पोटे समीक्षा पुरस्कार, पद्मगंधा प्रतिष्ठानचा मंदाकिनी लोही समीक्षा पुरस्कार, आणि संस्कार भारतीचा स्व कल्पना व्यवहारे समीक्षा पुरस्कार प्राप्त झाले आहेत. समीक्षेची नवी दिशा ठरविणारा ग्रंथ म्हणून हा ग्रंथ ओळखला जातो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.