लातूर : प्रति वर्षाप्रमाणे यंदाही येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकॅडमीच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्काराचे आयोजन केले असून अकॅडमीचे हे 17 वे वर्ष आहे. मराठी भाषेतील, कथा, कविता, कादंबरी, संपादीत ग्रंथ, बालसाहित्य, आत्मचरित्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वरील ग्रंथ या पुरस्कार योजनेसाठी मागविण्यात येतात, अशी माहिती अकादमीचे सचिव प्रकाश घादगिने यांनी दिली आहे.
या पुरस्कार योजनेसाठी आपले साहित्य 01 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत प्रकाशीत झालेली असावी. आपले साहित्य दोन प्रतीत, पासपोर्ट आकाराचे तीन फोटो, संक्षिप्त परिचयासह 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत अकॅदमीचे पाठवावी.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रत्येक विभागात प्रथम क्रमांकास 1500 रुपये, व्दितीय 1000 रुपये तर तृतीय क्रमांकास 750 रुपये रोख, शाल श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतिचिन्हे देऊन गौरविण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दोन व्यक्तीचा गौरवही करण्यात येणार आहे.
तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त साहित्यिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन अकॅदमीचे अध्यक्ष डॉ. एस. एन. बोडके, कार्याध्यक्ष प्रा. श्रीधर गायकवाड, सचिव प्रकाश घादगिने, प्रा. डॉ. माधव गादेकर, आर. पी. गायकवाड, गोंडराज रावन आत्राम, अर्जुन कांबळे, शिवाजी गायकवाड, डॉ. संजय जमदाडे, अँड अंगद गायकवाड, कुसुमताई बोडके, वंदना गादेकर आदींनी केले आहे.
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
सचिव प्रकाश घादगिने,
राजलक्ष्मी निवारा, गगन विहार जवळ, विशाल नगर,
लातूर – 413512. मो. नं. 9421695454
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.