February 22, 2024
Manikrao Khul interview on weather forecast
Home »    उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फबारीचे आवर्तन
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

   उत्तर भारतात पुन्हा पाऊस व बर्फबारीचे आवर्तन

लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारत पुन्हा ओला होणार. सध्या तेथे पडत असणाऱ्या धुके व बर्फबारीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली. त्यामुळे रविवार दि.४ फेब्रुवारी पर्यन्त थंडी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या महाराष्ट्रात पडत असलेली थंडी अजुन अशीच १ फेब्रुवारी पर्यन्त जाणवणार आहे. विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान हे १४ डिग्री से.ग्रेड(म्हणजे सरासरी इतके तर काही भागात सरासरीपेक्षा एखाद्या डिग्रीने, तर  पुणे सातारा कोल्हापूर सांगली व छ. सं.नगर येथे सरासरीपेक्षा दोन डिग्रीने अधि ) तर दुपारचे कमाल तापमान ३० डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असु शकते, असे वाटते.   

विदर्भात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १२ डिग्री से.ग्रेड(म्हणजे सरासरी इतके) तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० डिग्री से. ग्रेड(म्हणजे सरासरी इतके) दरम्यानचे असु शकते, असे वाटते.   

उत्तर भारतातील थंडीचा परिणाम महाराष्ट्रवरही होवु शकतो. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिक जिल्हा वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान सरासरी इतके म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमीसारखी थंडी पहिल्या आठवड्यात जाणवेल.

नाशिक जिल्ह्यात मात्र पहाटेचे किमान तापमान सरासरी तापमानापेक्षा एक ते दिड डिग्रीने अधिक राहून म्हणजे १४ डिग्री से.ग्रेड च्या आसपास राहू शकते. त्यामुळे नेहमी पेक्षा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी कमी थंडी नाशिक जिल्ह्यात अनुभवायला मिळेल.  

Related posts

Saloni Art : चित्रातून लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली…

कामेश्वरी साहित्य मंडळाचे पुरस्कार जाहीर

रोहयो फळबागप्रमाणे वनौषधी लागवडीची हवी योजना

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More