September 27, 2023
awarness to avoid pollution of Rankala lake article by Milind Karanjkar
Home » रंकाळ्याचे प्रदुषण रोखण्यासाठी हवी जनजागृती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रंकाळ्याचे प्रदुषण रोखण्यासाठी हवी जनजागृती

सध्या कोल्हापूर येथील रंकाळा तलावाच्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. तलावाचे पाणी हिरवे होत आहे, याचा अर्थ पाण्यामध्ये क्लोरोफिल युक्त शेवाळाचे प्रमाण वाढलेले असण्याची शक्यता आहे. अर्थात हे अभ्यासाअंती समजणार आहे.

प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर

पदार्थ विज्ञान व खगोलशास्त्र विभाग प्रमुख
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर

आरोग्यासाठी स्वच्छ व प्रदूषण विरहित पाणी असणे आवश्यक असते. पाण्याच्या प्रदूषणाबाबत प्रामुख्याने त्याचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म बदलत असल्याने ते तपासून त्याबद्दल निष्कर्ष काढला जातो. भौतिक गुणधर्मामध्ये पाण्याचा वास त्याची चव त्याचा बदलणारा रंग त्याची पारदर्शकता याबाबतचा समावेश असतो. रासायनिक गुणधर्मामध्ये पाणी आम्लधर्मी किवां अल्कधर्मी बनले आहे का ? तसेच त्याचा केमिकल ऑक्सिजन डिमांड व बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड किती आहे याचा समावेश असतो. जैविक गुणधर्मामध्ये पाण्यात सूक्ष्म रोगप्रसारक जिवाणूंची वाढ झाली आहे का ? याची तपासणी करतात. ई कोलाई सारखे सूक्ष्म जीवांची तपासणी करीता पाण्याची स्टॅंडर्ड प्लेट तसेच ई कोलाईचा नंबर म्हणजे मोस्ट प्रोबेबल नंबर याचा उपयोग करतात.

विवेकानंद महाविद्यालयातील पदार्थ विज्ञान व खगोल शास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. मिलिंद मनोहर कारंजकर यांच्या मार्गदर्शनात ईनस्पायर स्कॉलरशिप असणाऱ्या विद्यार्थीनी रंकाळा तलावाच्या पाण्याचा अभ्यास गेली पाच वर्ष करीत आहेत. त्या करिता त्यांनी रंकाळच्या पाण्याचे निरनिराळ्या ठिकाणी असणारे सरफेस टेन्शन मोजले. हे सरफेस टेन्शन वातावरणातील तापमान तसेच पाण्यामध्ये मिसळरणाऱ्या घटकावरती अवलंबून असलेने प्रत्यक्ष जागेवरती जाऊन उपकरणाच्या साह्याने मोजलेले आहे. त्यांच्या अभ्यासातून असे अनुमान निघाले आहे कि पाण्याचे सरफेस टेन्शन हे कमी झालेले असून ते सध्या ५४.१४ डाईंन पर सेंटीमीटर एवढे आहे. पाणी शुद्ध असेल तर हीच ७२ डाइन पर सेंटीमीटर एवढे असते. लॉकडाउनच्या काळामध्ये ह्याच पाण्याचे सरफेस टेन्शन ६७.७४ एवढे म्हणजेच शुद्ध पाण्याच्या जवळ होते. राधानगरी धरणाच्या पाण्याचा सरफेस टेन्शन हे शुद्ध पाण्या एवढे आहे.

सध्यस्थिती मध्ये रंकाळाच्या पाण्यामध्ये कपडे धुणे, अंघोळ करणे, जनावरे धुणे या सारख्या गोष्टी चालू आहेत व त्याकरिता साबणाचा वापर केला जातो. साबण पाण्यामध्ये विरघळत असल्याने त्याचा परिणाम हा सरफेस टेन्शन कमी होण्यास कारणीभूत आहे. त्याच बरोबर पाण्यामध्ये गाड्या धूतल्याने गाड्या मधील ऑइल पाण्यामध्ये मिसळले जात आहे. ऑईलची घनता हि पाण्यापेक्षा कमी असलेने ते पाण्यावरती तरंगते व त्यामुळे पाण्यावरती पडणारी सूर्यकिरणे ही त्या ऑइल वरून परावर्तित होऊन त्याचा परिणाम हा प्रकाशसंश्लेशन क्रियेवरती होतो. याचा फटका हा पाण्यामध्ये असणाऱ्या जलचर तसेच सूक्ष्म वनस्पती यावर होतो.

सध्या पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. तलावाचे पाणी हिरवे होत आहे, याचा अर्थ पाण्यामध्ये क्लोरोफिल युक्त शेवाळाचे प्रमाण वाढलेले असण्याची शक्यता आहे. अर्थात हे अभ्यासाअंती समजणार आहे. यावरती उपाय म्हणजे लोकांमध्ये पाणी प्रदूषणाबाबत जनजागृती करणे, पाणी वाहते ठेवणे, पाण्यामध्ये प्रशासनाने आखून दिलेल्या सूचनांचे जबाबदार नागरिक म्हणून पालन करणे. त्यामुळे पाणी हे स्वच्छ, सुंदर व नितळ होईल. आपण ओंजळीत घेऊन पाणी पिऊ शकेन. भविष्यामध्ये या पाण्याचे रासायनिक व जैविक गुणधर्म तपासले जाणार आहेत.

Related posts

भारतातील केळी, बेबीकॉर्न कॅनडा बाजारपेठेत

अन्नदात्याच्या स्वयंपूर्णतेचाही व्हावा विचार !

नदी संवर्धन करताना याचाही व्हावा विचार…

Leave a Comment