October 4, 2023
Rankala Ranktirth shouryatirth pakshitirth book review
Home » रंकाळ्याची सर्वांगीण बखर ….
काय चाललयं अवतीभवती

रंकाळ्याची सर्वांगीण बखर ….

 

‘कोल्हापूरच्या जनजीवनाचा सखा’ असे ज्याचे यथोचित वर्णन केले जाते अशा वैभवशाली रंकाळा या निसर्गरम्य पर्यटनस्थळाची परिपूर्ण अशी माहिती या सर्वांगसुंदर पुस्तकातून शब्दबद्ध झाली आहे. रंकाळ्याबद्दल इत्थंभूत माहिती देणारे हे संदर्भमूल्य असलेले देखणे पुस्तक वाचनीय व संग्राह्य असे झाले आहे.

– अशोक म. वाडकर

आर्किटेक्ट

‘कोल्हापूरच्या जनजीवनाचा सखा’ असे ज्याचे यथोचित वर्णन केले जाते अशा वैभवशाली रंकाळा या निसर्गरम्य पर्यटनस्थळाची परिपूर्ण अशी माहिती या सर्वांगसुंदर पुस्तकातून शब्दबद्ध झाली आहे. जगात शहरातील तलावाची सर्वांगीण माहिती देणारे असे पुस्तक रंकाळाप्रेमी जिवलगांच्या साक्षीने प्रकाशित होते ही घटनाच मुळी अभूतपूर्व व अभिमानास्पद अशी आहे.

रंकाळ्याशी अनुषंगिक माहिती

पुस्तकात रंकतीर्थ, शौर्यतीर्थ व पक्षीतीर्थ असे तीन विभाग असून त्यामध्ये रंकाळ्याशी अनुषंगिक माहिती दिली आहे. ‘रंकतीर्थ रंकाळा’ या पहिल्या विभागात रंकाळ्याची निर्मिती व इतिहास, संध्यामठ व शालिनी पॅलेस यांची वास्तुशिल्पे, रंकाळ्याचे बांधकाम, रंकाळा टाॅवर व धुण्याच्या चाव्यांबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.

रंकाळा कवनातून भेटतो. शाहिरीतून प्रकटतो. चित्रातून गवसतो. जलरंगातून मनामनात उतरतो. अभिजात कलावंतांच्या चित्र शिल्पातून साकारतो. शहरातील अनेक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या वाद-चर्चातून जीवंतपणे उभा राहातो. अनेक अजरामर कलाकृतींचा जन्म झाला तो रंकाळा. ज्याच्या आसपास कित्येक चित्रपटांचा उदय झाला तो रंकाळा. कोल्हापूरच्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला रंकाळा. या पुस्तकातून साकारला आहे.

श्रीराम पवार, संपादक-संचालक, सकाळ

कला व साहित्य समृद्ध करणारा रंकाळा

‘शौर्यतीर्थ रंकाळा’ या विभागात हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ, स्वातंत्र्यलढ्याचा थरार, कला व साहित्य समृद्ध करणारा रंकाळा, रंकाळा चौपाटी, जिवाभावाचा सखा, चित्रिकरणाचे केंद्र, प्रदूषण व लोक चळवळ, पदपथ उद्यान इत्यादी लेख आहेत.

रंकाळ्यावरील विविध विधायक उपक्रम

‘पक्षीतीर्थ रंकाळा’ या तिसऱ्या विभागात रंकाळ्यावरील समृद्ध जैवविविधता, २५ डिसेंबर: रंकाळा दिवस, रंकाळ्यावरील वृक्षलागवड व स्वच्छता मोहिम, रंकाळ्याचं बदलतं रूप, रंकाळ्याचा समृद्ध वारसा व रंकाळ्यावरील विधायकता व विविधता असे माहिती देणारे विस्तृत लेख आहेत.

रंकाळा कोल्हापूरच्या सामाजिक जीवनाचं बॅरोमीटर आहे. कोल्हापूरचं नैसर्गिक साैंदर्यस्थळ आहे. यासाठी त्याची नैसर्गिक बाजू समजून घेतली पाहीजे. ती संवर्धित केली पाहीजे. रंकतीर्थ, शौर्यतीर्थ, पक्षीतीर्थ असे त्रिवेधी स्वरुप या पुस्तक रुपाने पुढे आले आहे. रंकाळ्याला प्रबोधनतीर्थ अशीही एक मीती जोडता येईल.

श्रीराम पवार, संपादक-संचालक, सकाळ

पुस्तकात रंकाळ्याची अत्यंत दुर्मीळ नऊ ग्लेझड् पानावरील विविध काळातील कृष्ण धवल व रंगीत प्रासंगिक छायाचित्रे आहेत. सकाळ माध्यम समूहाचे संपादक – संचालक श्रीराम पवार यांच्या लाभलेल्या लालित्यपूर्ण दीर्घ प्रस्तावनेमुळे पुस्तकाचे अंतरंग अधिकच खुलले आहे. शीर्षकात त्यांनी रंकाळ्याचा उचित असा उल्लेख ‘प्रबोधनतीर्थ’ असाही केला आहे.

लेखक राजेंद्र पाटील यांच्या माहिती संकलनातील डोळस कष्टाचे मोल स्तुत्य आहे. असे पानापानांतून जाणवते. संजय शेलारांचे मनोहारी मुखपृष्ठ लाभलेल्या या पुस्तकाच्या प्रकाशनाची धुरा ‘अक्षर दालन’ या स्थानिक प्रकाशनाने सांभाळली आहे. रंकाळ्याबद्दल इत्थंभूत माहिती देणाऱे हे संदर्भमूल्य असलेले देखणे पुस्तक वाचनीय व संग्राह्य असे झाले आहे.

राजेंद्र पाटील यांनी रंकाळ्याचा प्राचीन व शिवपूर्वकालीन इतिहास पुस्तक रूपाने पुढे आणला आहे.

खासदार संभाजीराजे छत्रपती

————————

इतिहासातील अनेक संदर्भ व पुरावे शोधून राजेंद्र पाटील यांनी अभ्यासपूर्ण पुस्तक लेखन केले आहे. प्राचीन काळापासूनचे रंकाळ्याचे सर्वांगीण महत्व या पुस्तकात विषद केले आहे.

डॉ. वसंतराव मोरे, ज्येष्ठ इतिहास तज्ञ

———————-

रंकभैरवाच्या नावावरून हा रंकतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांच्या पराक्रमाने हे शौर्यतीर्थ, देशविदेशातील पक्षांच्या हजेरीने हे पक्षीतीर्थ असा प्राचिन अन् ऐतिहासिक वारसा लाभलेला रंकाळा पुस्तक रुपात मांडताना त्याचे संवर्धन आणि संरक्षण हा उदात्त हेतू ठेवला आहे.

– राजेंद्र पाटील, लेखक

पुस्तकाचे नाव – रंकाळा : रंकतीर्थ, शौर्यतीर्थ, पक्षीतीर्थ     

लेखक – राजेंद्र पाटील

मोबाईल नं – ९९२२९५९१०५

 प्रकाशक – अक्षर दालन, कोल्हापूर 

पृष्ठे – ११२+९,   किंमत – १७५ रुपये.   

          

रंकाळा तलाव
संध्यामठ रंकाळा तलाव
१९७२ च्या दुष्काळातील रंकाळा तलावाचे छायाचित्र
अतिवृष्टीमुळे २००५ मध्ये ओव्हरफ्लो झालेला रंकाळा तलाव
Memories of Rankala Talav
जलपर्णीच्या विळख्यातील रंकाळा तलाव

Related posts

योगाभ्यास, आयुर्वेद आता आधुनिक युगातल्या चाचण्या अन् कसोट्यांवर यशस्वी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्पेनमध्ये अवतरली महाराष्ट्र संस्कृती…

छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन येथे होणार १२ मार्चला

Leave a Comment