जीवनात रंगाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. रंगामुळे आपणाला विविध स्थितींची माहिती होते. रंग आपणास नेहमीच प्रभावित करत असतात. निसर्गातील विविध रंगाची छटा म्हणजे सोहळाच…या सोहळ्यात हिरव्या अन् निळ्या रंगाच्या मिश्रणाने मोरपंखी छटा उमटते..नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जाते. मोरपंखी हा रंग महागौरी देवीला खूप आवडतो. हा रंग वाढ आणि सुपिकतेचं प्रतीक आहे. या रंगाच्या नावाप्रमाणेच हा रंग सदभावना, सुंदरता, समृद्धी यांचेही प्रतीक आहे…नवरात्रीच्या निमित्ताने या रंगातील जैवविविधतेची कल्पना मांडली आहे पर्यावरण अभ्यासक प्रतिक मोरे यांनी…





