July 27, 2024
business-opportunities-after-lockdown Guideline book
Home » लॉकडाऊन नंतरच्या व्यवसाय संधीबाबत मार्गदर्शक पुस्तक
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

लॉकडाऊन नंतरच्या व्यवसाय संधीबाबत मार्गदर्शक पुस्तक

संकटे उद्योजकांना मार्गदर्शकच ठरत असतात. येणाऱ्या प्रत्येक संकटात लपलेल्या संधीचा शोध घेतला. तर एक नवा व्यवसाय उदयाला येऊ शकतो. आहे त्या व्यवसायात संकटांचा अभ्यास करून थोडासा बदल केल्यास. आपण इतरांपेक्षा संकटातुन लवकर सावरू शकतो. म्हणून व्यावसायिकांनी भविष्याचा वेध घेणारे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. बाजारपेठेतील छोटे बदल व त्याचे होणारे परिणाम समजावून सांगणाऱ्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. अशी पुस्तके संग्रही ठेवली पाहिजेत. असेच हे मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे.

रविंद्र खैरे

“लॉकडाऊन नंतरच्या व्यवसाय संधी” हे पुस्तक याच टप्प्यावर उद्योजक व व्यावसायिकांना मार्गदर्शक ठरेल. नव्याने व्यवसायात येऊ पाहणाऱ्यांना किंवा नोकरी गेल्यामुळे व्यवसायाचा विचार करणाऱ्यांना एक नवी दिशा दाखवण्याचे काम या पुस्तकातून करण्यात आले आहे. अगोदरपासूनच व्यवसायाचा अनुभव असणाऱ्यांनाही या पुस्तकातील नव्या कल्पना व्यवसायाच्या भरभराटीसाठी मार्गदर्शन अशा आहेत, लक्षात असू द्या जगण्याच्या वाटेवर संकटे ही येतच असतात. संकटासमोर लोटांगण घालणे हा मानवी स्वभाव नाही. मानवी इतिहासाची पाने चाळल्यास संकटांमधूनही संधीचा शोध घेणाऱ्या उद्योजकांनी जगाचा इतिहास घडवला आहे.

लॉकडाऊननंतरचे जग कसे असेल ? ग्राहकांची मानसिकता कशी असेल ? कर्जे काढून उभे केलेले व्यवसाय टिकतील का ? उद्योग व्यवसायात कोणते बदल करावे लागतील ? काही नव्या कौशल्यांचा अंगीकार करावा लागेल का ? लॉकडाउननंतर काही नव्या संधी उपलब्ध होतील का ? असे शेकडो प्रश्न उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना सतावत आहेत. सरकारने व्यवसायासाठी सोयीसुविधा पुरवण्याचे आश्वासन दिले असले, काही महिने बँकांच्या कर्ज हप्त्यात सवलत मिळाली असली. तरी लॉकडाऊननंतर निर्माण होणाऱ्या अनेक समस्यांना, स्वतः व्यावसायिकाला तोंड द्यावे लागते हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

कोणतेही संकट कधी एकटे येत नसते .आपल्याबरोबर अनेक दृश्य आणि अदृश्य संधींचे वहन ही संकटे करीत असतात. संकटांना घाबरून जाण्याची मानसिकता उद्योजक व व्यवसायिकांची कधीच नसते. मुळात व्यवसायाची उभारणी करतानाच संकटांचा व धोक्यांचा सामना करण्याची मानसिकता उद्योजकाने तयार केलेली असते. म्हणून येणारी संकटे उद्योजकांना मार्गदर्शकच ठरत असतात. येणाऱ्या प्रत्येक संकटात लपलेल्या संधीचा शोध घेतला. तर एक नवा व्यवसाय उदयाला येऊ शकतो. आहे त्या व्यवसायात संकटांचा अभ्यास करून थोडासा बदल केल्यास. आपण इतरांपेक्षा संकटातुन लवकर सावरू शकतो. म्हणून व्यवसायिकांनी भविष्याचा वेध घेणारे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. बाजारपेठेतील छोटे बदल व त्याचे होणारे परिणाम समजावून सांगणाऱ्या पुस्तकांचा अभ्यास केला पाहिजे. अशी पुस्तके संग्रही ठेवली पाहिजेत. अशाच पद्धतीचे हे मार्गदर्शक असे हे पुस्तक आहे.

पुस्तकाचे नाव – लॉकडाऊन नंतरच्या व्यवसाय संधी”

लेखकाचे नाव – रविंद्र खैरे,

मोबाईल – 96372 10599

प्रकाशक – विनय पल्बिकेशन

ई-बुकची मूळ किंमत – रु ९९

पुस्तक मिळण्याचे ठिकाण – https://imojo.in/e8v2ay



Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

स्वतःला दोष देणारी माणसे…

बंद शाळा, परीक्षा अन् राजकीय अनास्था 

मुलाखतीला सामोरे जाताना…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading