वृत्तपत्रात सर्वाधिक एक्सक्लुसिव्ह बातम्यांना महत्त्व असते. या बातम्या नुसत्या मनोरंजक नसतात, उलट या बातम्या समाजमनावर मोठा प्रभाव पाडतात. त्यातून अनेकदा अपेक्षित बदलही घडतात. काही अनिष्ट गोष्टींना पायबंदही होऊ शकतो. अशा एक्सक्लुसिव्ह बातम्या पत्रकार मिळवतो तरी कसा ? काही बातम्या अगदी सहज गप्पा मारताना मिळून जातात, तर काही स्पेशल सोर्सेसकडून मिळतात. काही उच्चपदस्थांचा विश्वास संपादन करून मिळवलेल्या असतात, तर काही अगदी अपघाताने…थोडक्यात काय, कोणतीही विशेष बातमी मिळवण्यामागे पत्रकाराची चिकाटी, कौशल्य, दूरदृष्टी आणि कल्पकता पणाला लागलेली असते. अशाच काही राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारी जगतातील गाजलेल्या बातम्या मिळवतानाचे तपशील आणि रंजक नाट्य प्रत्यक्ष बातम्यांसह उलगडून दाखवणारं एक्सक्लुसिव्ह पुस्तक बातमीमागची बातमी !
मुंबईत बाँम्बस्फोट झाले. त्या मागचा सुत्रघार कोण ? एखाद्या घटनेच्या मागची बातमी कशी शोधायची ? पाकिस्तानमध्ये अतिरेक्यांना कसे प्रशिक्षण दिले गेले ? ठाण्यात चार अतिरेक्यांना अटक, धगधगत्या पंजाबमधले जीवंत अनुभव अशा विविध खळबळजनक बातम्या मिळवण्यामागचे घडलेले रंजक नाट्य जयप्रकाश प्रधान यांनी बातमीमागीच बातमी या पुस्तकात मांडले आहे. अशा एक्सक्लुसिव्ह बातम्या शोधतांना त्यांना काही वेळेला तडजोडही करावी लागली. याबाबतचेही त्यांनी खुलासे या पुस्तकातून केले आहेत. बातमीमागची बातमी प्रधान यांना कशी मिळत होती हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चितच वाचायला हवे.
पुस्तकाचे नाव – बातमीमागची बातमी
लेखक – जयप्रकाश प्रधान
प्रकाशक – रोहन प्रकाशन
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.