साठी पार योगा
वयाची साठी उलटली सत्तरी आली
गडघ्याची वाटी कुरुबुरु लागली
बैस थोडे म्हणु लागली…
कधी दुखते खांदा, मान
कधी दुखते कंबर पाठ
दुखणे सुरू जाहले लागोपाठ
मानेला पट्टा, कंबरेला पट्टा
गुडघ्याला घाला नी कॅप
डॉक्टर फेऱ्या सुरू जाहल्या
काही केल्या गुण नाही आला
काय करावे कांही सुचेना
मग ठरविले फिरायला जाऊ, योगा करु
बिन पैशाचा इलाज करु
फिरणे, योगा सुरु केले
शरीराला कणखर बनविले
दुखणे सारे पळून गेले
कपाळ भाती टाळ्या वाजती
हास्याचे मग नाद घुमती
रोज पाळुया व्यायामाचे तंत्र
निरोगी शरीराचा हाच खरा गुरुमंत्र
नाही करूया हेवा देवा
सारे मिळुनी करूया योगा
वाटुन घेऊ हास्य हास्य मेवा