June 7, 2023
Decrease in Ediable Oil Prices except Mustered Oil
Home » मोहरीवगळता अन्य खाद्य तेलाच्या किंमतीत घट
काय चाललयं अवतीभवती

मोहरीवगळता अन्य खाद्य तेलाच्या किंमतीत घट

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत असतांना, देशांतर्गत, बाजारात मात्र, काही तेले वगळता, खाद्यतेलांच्या किमती कमी होतांना दिसत आहेत, अशी माहिती, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने दिली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलांच्या किमतीत लक्षणीय म्हणजे, 1.95% ते 7.17% वाढ झाली आहे, मात्र सरकारने या तेलावरील आयात शुल्क कमी केल्यानंतर देशांतल्या बाजारात मात्र, खाद्यतेलाच्या किमती कमी झाल्या आहेत. हे शुल्क कमी केल्यानंतर किमतीत झालेला परिणाम लक्षणीय आहे. (3.26% ते 8.58% पर्यंत घट). केंद्र सरकारने हे शुल्क कमी करण्यासाठी केलेल्या विविध प्रयत्नांचा ग्राहकांना लाभ मिळणार आहे. 

सोयाबीन तेल, सनफ्लॉवर तेल, कच्चे पाम तेल, आरबीडी पामोलीव्ह तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीत, गेल्या महिनाभरात अनुक्रमे, 1.85%, 3.15%, 8.44% आणि 10.92% इतकी वाढ झाली आहे. मात्र या तेलांवरील आयात शुल्क, 11 सप्टेंबर 2021 पासून कमी करण्यात आले आहे. त्यामुळे, य देशांतर्गत बाजारात, तेलाच्या किमती 0.22% ते 1.93% पर्यंत कमी झाल्या आहेत. मात्र, मोहरीचे तेल जे भारतातच तयार होणारे तेल असून, केंद्र सरकार करत असलेल्या विविध प्रयत्नांमुळे या किंमतीही लवकरच कमी होण्याची अपेक्षा आहे.

गव्हाच्या किंमतीत घट

घाऊक आणि किरकोळ अशा दोन्ही बाजारात, गव्हाच्या किमती, अनुक्रमे 5.39 % आणि  3.56 % कमी झाल्या आहेत. तांदळाच्या घाऊक किमतीत 0.07 % ची घट आणि किरकोळ किमतीत 1.26 % ची वाढ झाली आहे.

गव्हाच्या दरात वार्षिक तुलनेत, घाऊक किमतीत, 7.12 % तर किरकोळ बाजारात 4.37 % घट झाली आहे. तांदूळ आणि गव्हाच्या किमान हमीभावात वाढ झाली असली तरीही, (तांदूळ – 1868/क्विंटल वरुन, 1940 आणि गहू – 1925/क्विंटल वरुन, 1975 पर्यंत)  बाजारात, गहू आणि तांदळाच्या दरात घट झाली असून, सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही घट दिलासादायक आहे.

कडधान्यांच्या किंमतीत घट

मे महिन्याच्या तुलनेत, ऑक्टोबरमध्ये, चणा, तूर, उडीद आणि मूगाच्या किमती, अनुक्रमे 1.08 %, 2.65%, 2.83% आणि 4.99% ने घटल्या आहेत. कांदा, बटाटा, टोमॅटो यांच्या अखिल भारतीय किरकोळ किमतीतही वार्षिक तुलनेत, घट झाली आहे. बटाटा, 44.77 %  कांदा 17.09 % टक्के आणि टोमॅटोच्या किमती वार्षिक तुलनेत 22.83 % नी घटल्या आहेत.

Related posts

कवी हबीब भंडारे यांच्या कवितांचा विद्यापीठीय अभ्यासक्रमात समावेश

खुरपं : आधुनिक ग्रामीण स्त्रीजीवनाचा आलेख

स्थापत्य अभियंत्याचे पाऊल पडते पुढे…

Leave a Comment