डाॅ.प्रतिमा इंगोले ह्यांना एकशेदहावा पुरस्कार जाहीर
डाॅ. प्रतिमा इंगोले ह्यांना नागपूर येथील डाॅ. गिरीश गांधी फाऊंडेशनचा उत्कृष्ट कादंबरीकार पुरस्कार जाहीर झाला आहे. पंचवीस हजार रुपये रोख, सन्मान पत्र व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. डाॅ प्रतिमा इंगोले ह्यांना मिळालेला हा एकशे दहावा पुरस्कार आहे.
महत्त्वाच्या कादंबरीकार म्हणून हा पुरस्कार डॉ. इंगोले यांना प्रदान करण्यात येणार आहे. आत्तापर्यंत डॉ. इंगोले यांच्या सहा कादबंऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. पहिली कादंबरी ” बुढाईः जमिनीला आपोआप पडणारी भेग” ही भूमीविषयक कांदबरी असून तिला शासनाचा राज्य पुरस्कार मिळाला आहे. तर दुसरी “पार्टटाईम”ही कादंबरी शिक्षण क्षेत्रातील दुरवस्था चित्रित करणारी स्त्रीवादी कादंबरी आहे. कादंबरीकार ना.सी.फडके पुरस्कार या कादंबरीला प्राप्त झाला आहे.
तिसरी “आत्मघाताचे दशक”नावाची कादंबरी शेतकरी जीवनाचे विदारक चित्रण करणारी आहे. या कादंबरीला पद्मश्री विखे पाटील पुरस्कार व अन्य चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. डॉ. इंगोले यांच्या चौथ्या “बोडखी”नावाच्या नष्ट होणाऱ्या बलुतेदारीवर आधारित कादंबरीला महाराष्ट्रातील मान्यवर संस्थांचे चार पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तर “नक्षलग्रस्त या पाचव्या कादंबरीला जनसाहित्य पुरस्कारासह तुका म्हणे पुरस्कार व इतर पाच पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
डॉ. इंगोले यांची सहावी “राशाटेक”कादंबरी प्रकाशित झाली आहे. त्यांच्या कादंबऱ्यांवर महाराष्ट्रात पंचवीस अभ्यासक संशोधन करताहेत. सातवी कादंबरी “बाणगंगेतिरी”ही पंचमहाभूतांपैकी जलतत्वावर आधारित कादंबरी आहे. ती प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
एकशे दहा पुरस्कारापैकी सात पुरस्कार शासनाचे राज्य पुरस्कार आहेत. एक पुरस्कार सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार मिळाला आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.