March 29, 2024
Rashtrasant Vichar Sahitya Parishad awards declared
Home » राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर
काय चाललयं अवतीभवती

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर

पुरस्काराकरिता चंदू पाटील, उदयपाल, अरूण झगडकर, अनिल चौधरी, सौ. उगे, भिमटे आदींची निवड

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समितीच्यावतीने देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय विशेष पुरस्कारांची निवड समितीच्या द्वारे करण्यात आलेली आहे . इंजि. भाऊ थुटे वर्धा द्वारा पुरस्कृत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती पुरस्कार – आदर्श गाव घाटकुळ समिती यांना, रुखमाबाई देवाजी बोबडे स्मृती कर्मयोगी संत श्रीतुकारामदादा गीताचार्य साहित्य पुरस्कार – प्रा. डॉ. मोहन कापगते (ब्रम्हपुरी) यांना, जगन्नाथ गावंडे स्मृती प्रबोधन पुरस्कार सप्तखंजेरी वादक उदयपाल महाराज वणीकर यांना, गंगाधरराव घोडमारे स्मृती सेवा पुरस्कार – सौ. सुषमा विलासराव उगे , नांदगाव (पोडे) यांना , दिवंगत नारायण गेडकर स्मृती डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार प्रचार पुरस्कार – माणिक सुखदेव मुन , टाकळी( जि. वर्धा) यांना, लटारी उगे स्मृती उत्कृष्ट झाडीपट्टी नाट्य कलावंत पुरस्कार – महेंद्र भिमटे विहीरगाव (चिमूर )यांना, पंढरीनाथ चंदनखेडे पुणे पुरस्कृत साने गुरुजी शिक्षक पुरस्कार अरुण झगडकर गोंडपिपरी यांना , प्रमोद केशव दशमुखे स्मृति तंत्रस्नेही शिक्षक पुरस्कार – रामकृष्ण चनकापुरे वढोली यांना , पंढरीनाथ चंदनखेडे पुणे द्वारा पुरस्कृत श्रीगुरुदेव गोरक्षक पुरस्कार सौ. ललिताबाई सेवादासजी खुणे आंधळी (कुरखेडा)यांना , यशवंत बोबडे स्मृती श्रीगुरुदेव श्रमश्री पुरस्कार अनिल चौधरी रामपूर यांना, माधव पाटील जेणेकर स्मृती श्रीगुरुदेव कृषी सेवा पुरस्कार – मधुकर नानाजी भेदोडकर सांगडी (तेलंगणा स्टेट) यांना, मोहनलाल शर्मा आणि कुंदनलाल शर्मा यांच्या स्मृती प्रित्यर्थ श्रीगुरुदेव भजन गायन पुरस्कार राजेंद्र पोईनकर ऊर्जानगर यांना, पुरुषोत्तम पाटील हिरादेवे स्मृती श्रीगुरुदेव सद्भावना पुरस्कार श्री.चंदू पाटील मारकवार (राजगड )यांना, प्रो. बबनराव डोहे स्मृती गुणवंत विद्यार्थी सन्मान – आदित्य संजय झाडे यांना , मोहनदास मेश्राम द्वारा पुरस्कृत सावित्रीबाई फुले आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार कु. साक्षी सागर देशमुख यांना, माधवराव दुणेदार स्मृती श्रीगुरुदेव दाम्पत्य पुरस्कार सौ. श्यामलता विलास चौधरी पेंढरी ( कोके.) यांना जाहीर करण्यात आला आहे.

आलेल्या प्रस्तावातून सर्वानुमते ही निवड करण्यात आलेली आहे. निवड झालेल्या मान्यवरांना आदर्श घाटकुळ ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर येथे येत्या १२ व १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात सन्मानित करण्यात येणार आहे.

पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, परिषदेचे सरचिटणीस एड.‌राजेंद्र जेणेकर , स्वागताध्यक्ष विनोद देशमुख, निवड समितीचे पदाधिकारी भाऊ थुटे वर्धा, संजय तिळसमृतकर (तेलंगण), यशवंत दुनेदार भंडारा, शंशाकराव घोडमारे वर्धा, डॉ. श्रावण बाणासुरे बल्लारपूर, संजय वैद्य वरोरा, रविंद्र बोबडे,शंकर दरेकर, देवराव कोंडेकर उर्जानगर, भाऊराव बोबडे राजुरा , डॉ. दिनेश डोहे अहमदनगर, नामदेव गेडकर चंद्रपूर, मोहन मेश्राम राजुरा, विशाल गांवडे भद्रावती, पंढरीनाथ चंदनखेडे पुणे, प्रा. राजेंद्र सोनवणे पुणे , केशवराव दशमुखे गडचिरोली यांनी अभिनंदन केले आहे.

Related posts

आळसंद ला सोमवारी पाचवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

जगातील सर्वात उंचीवरचे टपाल कार्यालय

ज्ञानी होण्यासाठी अज्ञानाची ओळख असणे गरजेचे

Leave a Comment