July 21, 2024
Kalamkar Live, a virtual satire of human artificial survival
Home » मानवी कृत्रिम जगण्याचे आभासी सटायर:काळमेकर लाइव्ह
मुक्त संवाद

मानवी कृत्रिम जगण्याचे आभासी सटायर:काळमेकर लाइव्ह

आज समाज दुभंगाच्या चळवळी सुरू झाल्या असून धर्म, जात, पंथ, भाषा, शिक्षण आणि व्यवसाय अशा भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. समकालिन आभासी व प्रत्यक्ष वास्तव भयानक आहे या दोन्ही सुंदर सांगड घालणारी कादंबरी म्हणजे काळमेकर लाइव्ह.

डॉ. श्रीकांत पाटील

एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावरील, कादंबरी, कविता, गझल, समीक्षा, या साहित्य प्रकारांमध्ये आपली नाममुद्रा उमटवलेले प्रयोगशील लेखक म्हणून डॉ. बाळासाहेब लबडे यांचा उल्लेख करावा लागतो. त्यांनी महाद्वार, ब्लाटेंटिया, मुंबई-बंबई-बॉम्बे हे कविता संग्रह तर “एक कैफियत” हा गझलसंग्रह लिहिला आहे. तर “पिपिलिका मुक्तिधाम”, “शेवटची लाओग्राफिया” या दोन वेगळ्या धाटणीच्या कादंबर्‍या लिहित्या आहेत. ‘काळमकर लाइव्ह’ ही त्यांची तिसरी कादंबरी. काळाचे विस्तीर्ण अवकाश आपल्या परिघात सामावून घेणारी प्रयोगात्मक कादंबरी आहे.

कादंबरी म्हटले की, आदि-मध्य-अंत असे साधे सरळ कथानक, गुंतागुंत, निरगाठ व त्याची उकल अशा त्याच्या सरळ धाग्यांनी बांधलेली सामान्यतः दिसून येते. घटना, प्रसंग, पात्रे, संवाद बोली या घटकांना घेऊन कादंबरीकार एखाद्या नव्या विषयाला आपल्या कादंबरीत नवा आयाम देतो. प्रसंगी त्यात घटना, घडामोडी, इतिहास, पुराण, शेती, उद्योग, शिक्षण या क्षेत्रातील प्रसंगाची कल्पना व वास्तवाच्या अंगानी कथानकाची मांडणी करीत असतो. कादंबरीचा हा पारंपरिक बाज झुगारून देवून सगळ्या विश्वाचा पसारा काळाच्या परिघात सामावून लेखन करण्याचे धाडस येथे कादंबरीकाराने केलेले आहे. ‘काळ मकेर लाइव्ह’ ही काळाला कवेत घेणारी प्रयोगात्मक कादंबरी आहे.

अँपवर जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांचं चित्रण प्रभावी आलं आहे त्या पकिस्तान अफगाणीस्थानातील चालक जी भाषा बोलत आहेत ती भन्नाट आहे.
“सॉरी मी ऑन वेहिकल यात्रीगन ध्यान दें. कोई भी गलत कमेंट ना करे. एक मिनिट में गया और आया. मेरा फेव्हरेट साँग. एक चुम्मा तो बनता हैं. वेलकम ऑल वेलकम ऑल. गाणे लागले आणि बंद झाले. स्पीन सुरू झाले. लुटेरे पळून जाऊ लागले, पण त्याने सुंदर कॉमेंट्री सुरू केली.
” ओन्ली एक गेम. कोन करेगा एन्ट्री. आ गयी हैं एक एन्ट्री. वन मोर… मोर. कोई बात नहीं. घुमादीया जाये. वन
कौन तेज आ रहा हैं. एक मिनिट हो गया. बने रहिये हमारे साथ क्या ही बतायें, क्या ही बतायें. व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी चली ट्रेन बैठो. टेन टेन टेन. गुडलक राजगुरू, यहापर हम बॉक्स ओपन कर लेंगे. अभी मैं अपने आप को मुट करते हैं. स्पील सुरू झाले. लुटेरे कंटाळले. पळून जाऊ लागले. बॉस बोलू लागला.

” भगोडे कहा भाग रहे हो. ये पानिपत हैं. यहाँ से तुम खाली हात नहीं जा सकते. फैजू आबदाली कहा हो. लौट जाओ. रूम फुल्ल, रूम फुल्ल, मैं बॉक्स फोड रहा हूँ. लुटेऱ्यांचा सरदार आला. त्याने कॉमेंट्री सुरू केली.
टेन टेन टेल… की बेट हैं. क्या बात हैं. नाईस जॉइनिंग फर्स्ट इलेमिनेशन हो गया. तितली. आ जाओ पांच बचे हैं. जल्दी जल्दी. मनीलाजी बाहर गयी. बेगम सेमिफायनल, पापा की परी फायनल में स्मिथ जीत गया. क्या बात, क्या बात. लगा दो सर फटाफट. पन्नास टक्के लोक पळून गेले. लुटेरो के सरदार ने कॉमेंट्री केली.
“ओह माय गॉड. मेरी बॅटरी लो हो गयी. हाय ए क्या हो गया. इतना स्मार्ट डीपी, क्या बात हैं. बचपन में रहकर क्या करोगे. जरा जवानी में आवो. दस का लगाकर क्या करोगे. पचासो लगाव. “
यह सब शुरू होने के बाद, मेरे घोड़े ने अपना पैर खोना शुरू कर दिया। अब ऊब चुके हैं। डाकू बनकर कब तक इंतजार करें. और ये लोग हमें उल्लू बना देंगे.”(पृ २४९)

आज समाज दुभंगाच्या चळवळी सुरू झाल्या असून धर्म, जात, पंथ, भाषा, शिक्षण आणि व्यवसाय अशा भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. समकालिन आभासी व प्रत्यक्ष वास्तव भयानक आहे या दोन्ही सुंदर सांगड घालणारी कादंबरी म्हणजे काळमेकर लाइव्ह. संशयग्रस्त आणि अनके द्वंद्वात अडकलेला समाज हे आजचे वास्तव वर्तमान आहे. ही जागतिकीकरणाची देणगी आहे. ‘काळमेकर लाइव्ह’मध्ये जागतिकीकरणानंतरचे समाजमन यात विसंगती, विस्कळीतपणा, तुटलेपणा, तुटकपणा, तटस्थता आणि भयस्थता आहे, या कादंबरीला कोरोनाची पार्श्वभूमी आहे. लॉकडाउनच्या काळात जागतिक व्यवहार ठप्प झाले, मानव अगतिक झाला. चलनवलन थांबले. यातून अनेक समस्यांची श्रृंखला निर्माण झाली. यामुळे मानवी जीवनात आलेल्या रिकामेपणाचा पट हे या कादंबरीचे परिमाण आहे.अँपवर असणारी जागतिक माणसे लेखकाने जामरसह जिवंत केली आहेत.

आभासी जग ही माहिती तंत्रज्ञानाची निर्मिती आहे. आज लोक वास्तव जगण्यापेक्षा आभासी जगत आहेत, आभासी जाळ्यात अडकत आहेत..
“, म्हातारा लाइव्ह आला आहे. हाच आमचा व्याभिचारी भाव आहे. भट्टलोल्लटांनो, श्रीशंकुकांनो, भट्टनायकांनो, अभिनवगुप्तांनो तुम्ही विचार करत बसा ” तत्र ‘चा ही दरी वाढवणे हेच आमचे ध्येय पिझ्झा, बिझ्झा, बर्गर, मरगर, मॅकडानल्ट इज इन फ्रिज नाऊ वुई आर अफरेड टू द व्हेजिटेबल क्लिन क्लिन हॅन्डवाश हॅव सम फ्री लाईन लाईन मास्कसाठी लाईन
चिंध्या विकणे हा काळाचा गुणधर्म
अनामिक भीती मनुष्य जात नष्ट होण्याची पिटाई पिटाई लुटाई लुटाई धिटाई मारा मारा डेटा मारा मॅसेज मॅसेज
राहल टच राहल तार लाइफ कनेक्ट करा
आमची शाखा कुठेही नाही
पूर्ण जगात
रिंगटोन आजच डाऊनलोड करा
साम्राज्यवादी पिल्ले सुसाट
भांडवलशाहीची भांडवल सुसाट
नेटीझमची पिल्ले सुसाट कोसळली
राष्ट्रीय विचारधारा बेफाम सुसाट
(‘काळ’ मेकर लाइव्ह । २६९)

या कादंबरीत एका अ‍ॅपच्या माध्यमातून हे आभासी जग उभा करण्याचा लेखकाचा प्रयत्न आहे. यामध्ये लोक अ‍ॅपवर येतात. बोलतात, गाणी गावात, टिपण्या करतात, परफॉर्म करतात. यामध्ये लेखक जसे घडले तसे वर्णन करतो. एकप्रकारे ‘आँखो देखा हाल’ असे चित्रण पहात असल्याचा भास कादंबरी वाचताना होतो. एकंदरीत आभासी वास्तवाचे चित्रण ही कादंबरी करते. तसेच मानवी जीवनातील विस्कळविपणा, मूल्यमान हरविल्याची जाणीव ही कादंबरी करून देते.

नवीन माध्यमांनी व्यावसायिक पातळीवर येऊन आपल्या मेंदूचा ताबा घेतला आहे. त्यापैकी स्टारमेकरवर असलेल्या वीस करोड लोकांपैकी निवडक जवळपास शंभर व्यक्तिरेखा लेखकाने यात निवडल्या असून त्यांच्या वळवळणार्‍या नाविन्याचा शोध घेतला आहे. यामधून त्यांचे जगणे पकडले आहे. यात अमेरिका इग्लंड रशिया चिन अफगाणीस्थान थायलंड इंडोनेशिया आँष्ट्रेलिया आदि देशातील व्यक्तिरेखांसर भारतातील विविध व्यक्तिरेखा त्यांच्या भाषेसह आल्या आहेत.
नव्या माध्यमांची मानवी जीवनाला चिकटलेली व्यसनाधिनता ही कादंबरी प्रतिबिबित करते. ही काळाची कादंबरी असून यातील म्हातारा काळाचे तुकडे आणून त्यावर भाष्य करतो.

आज मानवी जगणे कृत्रिम झालेले आहे. माणूस हा लाईक, शेअर आणि कमेरामध्ये अडकून पडला आहे. तसेच या कादंबरीत बखरची भाषा लाईव्ह फॉर्ममध्ये आली असून गल्ली ते दिल्ली असे समकालिन राजकारणाचे चित्रण आले आहे. वायरल करण्याचे अघोषित युद्ध सगळीकडेच सुरु आहे. लुटेरे गँगचे सटायर अप्रतिम आहे.यामध्ये कादंबरीकार काळाच्या पोतात समकालीन व भविष्यकालीन काय आहे ?याचा वेध घेतो. अनेक पातळ्यांवर हरवलेल्या मूल्यांचा वेध घेतो. त्यांच्यातील संघर्ष टिपतो. लाइव्ह असणारे लोक समाजातील विविध घटकांवर, लोकांवर भाष्य करतात ते यामध्ये आले आहे.

आज प्रत्येकाचे कायम मोबाइलकडे लक्ष आहे. सरफिंग ही एक मानसिक समस्या झालेली आहे. या समस्येचा आविष्कारही ही कादंबरी करते. कोरोना लाइव्ह काळ, जागतिक पातळीवरील भांडवलशाही , जगणं हे एक नाटक, त्याबाबतची स्वगते, लटेरे गँग, कोरोना कालातील विदारक वास्तव, जीवनातील वास्तव – स्वगतामधून एकांकीकांमधून समाजदर्शन, अगळीकडेच असणारा काळाचा महीमा ही कादंबरी दाखवून देते. आज आपण नक्की कोणत्या दिशेने जात आहोत याचा शोध आणि वेध घेण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते.

कादंबरीची भाषा शैली, नव्या जगाचे वास्तवदर्शी चित्रण, प्रयोगशीलता, शंभरहून अधिक पात्रांचा वावर व एकूणच वैश्विक अवकाशात किंबहुना त्याच परिघात घडत जाणारे नाट्य काव्याची शृंखला असणारे कथानक ही या कादंबरीची वैशिष्ट्ये नमूद करता येतील.
नवा विषय, नवी वैशिष्ट्यपूर्ण शैली. अठरा प्रकरणात विखुरलेले कथानक व यातून यांची सांघेजाडे करणारे कथानक अशी प्रयोगशील आगळीवेगळी अपूर्व अशी कादंबरी

‘काळमेकर लाइव्ह’ ही समकालीन भान असलेली व वास्तव दर्शविणारी कादंबरी आहे. या कादंबरीला कोरोनाची पार्श्वभूमी आहे. आभासी माध्यमांमुळे माणसाच्या आयुष्यात विस्कळीतपणा, तुटलेपणा आला असून मूल्यभान हरवलेले आहे. नाती दुरावलेली असून माणूस एकलकोंडा होत असल्याने अनेक सामाजिक, कौटुंबिक, मानसिक समस्या निर्माण होत आहेत. नव्या माध्यमांची व्यसने माणसाच्या आयुष्याला चिकटली असून कोणताही घटक यास अपवाद राहिलेला नाही. सर्वत्र मानवी जीवनमूल्यांची पडझड झाली असून मानवी जीवन हे कृत्रिम झालेले आहे. या कादंबरीत लेखकाने हरवलेल्या मानवी मूल्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. समाजदर्शन घडवण्याचं अवघड काम या कादंबरीने केलेले असून मराठी कादंबरी इतिहासात ही कादंबरी ‘माईल स्टोन’ होऊन नोंद घ्यावी अशी ही कादंबरी आहे.

पुस्तकाचे नाव :काळमेकर लाइव्ह ( कादंबरी)
लेखक : बाळासाहेब लबडे
प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन, पुणे.
मुखपृष्ठ : प्रमोदकुमार अणेराव
पृष्ठ्ये :२९६
प्रथम आवृत्ती:२०२३
किंमत :५५०/-


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

गडकिल्ल्यांची अनोखी सफर

सर्व शक्तीमान सूर्य 

प्र (शासन)

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading