March 30, 2023
Eco-friendly science based holi in Gor Banjara Community
Home » गोरबंजारा समाजाची निसर्गपूजक विज्ञानवादी होळी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गोरबंजारा समाजाची निसर्गपूजक विज्ञानवादी होळी

बंजारा युग : युगप्रवर्तक बंजारा होळी
बंजारा समाज धनी दानी न्यायदानी व बलिदानी समाज आहे. बंजारा समाजा उत्सव प्रिय समाज आहे. सर्वसमावेशक चाल, चलन, चरित्र व नाच गाण्यातून तो आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवितो. बंजारा समाजातील लोकगीते प्राचीन्तम काळापासून अनुभूतीचा खजाना आहे. होळीच्या निमित्ताने वैश्विक पातळीवर जीवनामध्ये रंगाची उधळण करणारी जमात म्हणून देखील याकडे पाहिले जाते.

प्रा. डॉ. अशोक पवार, डॉ. सुनिता राठोड-पवार
औरंगाबाद ९४२१७५८३५७

बंजारा संस्कृती ही वैश्विक पातळीवर एक चलाय मान संस्कृती आहे, त्या संस्कृतीला “बंजारा युग” नावाने देखील संबोधले जाते. याबाबतचा उल्लेख आदिम अदिपुरूष ४०० पृष्ठाच्या मोठ्या ग्रंथामध्ये केलेला आहे. तसेच विज्ञान अंकाच्या मोठ्या ग्रंथांमध्ये देखील त्याचा उल्लेख केलेला आहे. ज्याचा संदर्भ मी बंजारा जमातीच्या उत्पत्तीचा इतिहास ‘बंजारायुग’ या ग्रंथामध्ये केलेला आहे.

भारतीय संस्कृतीत होळी सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बंजारा जमातीतील होळीचे आगळे वेगळेपण हे यातून स्पष्ट दिसून येते. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातून ठळकपणे स्पष्ट होतो.
जगातील कोणत्याही देशाची समाजाची व जमातीची विकासाची धारणा ही केवळ आर्थिक दृष्टिकोनातून नव्हे तर आनंददायी जीवनाच्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.

जागतिक पातळीवर विकासाच्या मापनाचा आधार हा ‘हॅपिनेस इंडेक्स’ च्या माध्यमातून मोजला जात आहे. केवळ पैशाच्या दृष्टिकोनातून मोजला जात नाहीये. बंजारा जमात हे आदिम जमात असल्यामुळे सदरील समाजात होळी वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. प्राचीन काळापासून असता गायक अनेक चढउतार घेऊनही जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यातून स्पष्ट होतो.

बंजारा समाज धनी दानी न्यायदानी व बलिदानी समाज आहे. बंजारा समाजा उत्सव प्रिय समाज आहे. सर्वसमावेशक चाल, चलन, चरित्र व नाच गाण्यातून तो आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवितो. बंजारा समाजातील लोकगीते प्राचीन्तम काळापासून अनुभूतीचा खजाना आहे. होळीच्या निमित्ताने वैश्विक पातळीवर जीवनामध्ये रंगाची उधळण करणारी जमात म्हणून देखील याकडे पाहिले जाते. होळी सणाच्या निमित्ताने नाचत गात भांडत भांडत आपल्याला व्यक्त व मांडण्याचा देखील योग असतो. याचे दर्शन खालील गीतातून आपल्याला घडते.

“धूम मची धूमे धूमेरे बंनजारा,
काकी दादी रिस मत करजो,
हम कोनी बोला,

होळी बोलचये “भांड” !!

बंजारा जमातीचा धनी, दानी न्यायदाणी तथा बलिदानीचा इतिहास असलेला उत्सवप्रिय जमाती आहे. आंतरराष्ट्रीय किर्ती चे भाषाविध डॉ.गणेश देवी यांनी आमच्या बंजारा जमातीच्या स्वर्णिम इतिहासाच्या एका खडांवर समिक्षा करताना नमूद केले आहे की, बंजारा जमातीच्या लोकसाहित्यात ६०,००० पेक्षा लोकगीते आहेत.
यावरून असे स्पष्ट होते की, एवढ्या लोकगितांची खाण जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही आढळुन येत नाहीत. लोकसाहित्याच्या जगतात स्वर्णिम ऐतिहासाची मेजवानी दुसरीकडे आढळून येत नाही. बंजारा समाजातील हे सर्वाधिक प्राचिनतमतेची साक्ष आहे.

गोरबंजारा समाज होळी मोठ्या उत्सवात साजरी करतात. अत्यंत उत्सवप्रिय पध्दतीने बंजारा समाजातील स्री-पुरुष हा सण एकत्रित साजरा करतात. सात रंगांची उधळण करीत पळसाच्या फुलांची” “केसुला” नैसर्गिक पद्धतीने रंग करून होळी साजरी करण्यात येते.
‘डोळ्यात अश्रू पाठीवर लदेनीचे रसदीचेओझे घेऊन जगाचे पालन पोषण करीत भटकंती करणारी बंजारा जमाती होय’. प्राचीन कालखंडापासून सिंधू संस्कृतीतील आदिम जमाती पासून होळी या सणाची प्रथा-परंपरा पार पाडली जाते. गोरबंजारा जमातींमध्ये इतर सणाच्या तुलनेमध्ये होळी या सणाला अत्यंत सर्वसाधारण असे महत्त्व आहे.

फाल्गुन महिन्यात प्रकृती नटून-थटून होळी या सणाचे स्वागत करते . निसर्ग मनसोक्त विविध रंगाची उधळण करते. होळीला एक महिन्याचा अवधी असताना वाडी तांड्याना होळीचे वेध लागतात.
खाणे, पिणे, नाच , गाण्याच्या ‘मोहा’ची नशा तांड्याला चढलेली असते.
“माझ्या बंजाराच्या बोल कौतुके!
परी नाच गाण्यात,
अवघा जग जिंके!!
बंजारा समाजात होळी सकाळी पेटविली जाते.
रात्रभर तरुण-तरुणी स्त्री-पुरुष नाचत-गात रात्र जागत काढतात. तांडयातील स्त्रिया सकाळी उठून होळीची पूजा करतात. …..!
अंधाराकडून विजय उजेडाकडे जिवन जगण्याचं आगळेवेगळे रुप.
” आजा होळी कुळ – कुळ ये खेला…. !
आजा होळी राम- लचुमन खेला!!
होळीच्या दिवशी बंजारा समाजात मुलांचा नामकरण विधी ‘ धूंड ‘ साजरा केला जातो. ‘ धुंड’म्हणजे शोध घेणे. मुलाच्या नावाचा व पालकांचा शोध घेतला जातो.
दाराच्या पुढे दोन खुंटे
‘ दांडू’गाढले जातात. जो तरुण-तरुणींच्या लाठी- काठीचा मार खाऊन खुठे काढतात. अशाच तरुणाचा नामकरण विधी पार पाडला जातो.
आजच्या आधुनिक काळात तरुण व तरुणीवर अर्थात गेरिया – गेरळी वर करारमुक्त संस्कारयुक्त विधी, तांड्याच्या नायका पुढे पार पाडला जातो. आजच्या विभक्त कुटुंब पद्धती मध्ये सदरील संस्कार आजच्या आधुनिक काळात तेवढाच प्रासंगिक आहे. खुटा उपटन्या पूर्वी पडण्यापूर्वी मनसोक्त शिवीगाळ गाण्यातून करणाऱ्या स्त्रिया खुटा उपटल्यानंतर तरुणांना आशीर्वाद देतात.

पळसाच्या झाडा- फुला- पाना व मुळीला बंजारा समाजाच्या सणामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पळसाच्या झाडाला लागणाऱ्या ‘ केसुला ‘ या फुलाला समाज प्रतीक रुपात वापरते. गोपालक बंजारा समाज पळसाची ‘ आखाडी ‘ अर्थात पेरणी, पोळा व होळी या तिन्ही सणा प्रसंगी बसुराज्यांचे वारसदार म्हणून सन्मान करतात. केशूला प्रतिकूल परिस्थितीत तग धरून फुलणारे पळसाचे फुलांच्या रंगाची उधळण करून ‘ गेर ‘ मागतात. जमा झालेला गेर अथवा पैशातून सामुहीक भोजनाचा कार्यक्रम पार पाडून समूहभावना जागृत ठेवली जाते.

धुंड लोकसाहित्यात…. औषधी गुण असणार्‍या… मनमोहक निसर्ग व प्रकृतीचे वर्णन फार सुंदर आले आहे………..
..’ वडफुल लागे केसुला मोरयाये
ओगेरिया न पूछो नजर लागी काई ये…
सारी मांडवा गेरियाती भरोच
ओ गेरळीर मुंडो उत्तररोच ..”
गोरबंजारा हा गोपालक असणारा समाज अत्यंत उत्सवप्रिय होय.जगाच्या पाठीवर एवढा उत्सवप्रिय समाज आढळुन येत नाही.
एका पौर्णिमेपासून ,दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत नाचत-गात हा समाज होळी हा सण साजरा करतो.याला पोराणीक मुलामा लावुन सिमित करु नये.
” सिंधू नदी रेळेम
सप्तसिंधू रे पाळेम
आर्या दमळ लगा
नकोरे मारो
गोरो नायका “
अर्थात वैभव शाली
प्राचीनतम सिंधू संस्कृतीचा वारसदार असणारा हा सर्जनशील समाज होय.

होळी हा सण लाकडाची ठोळी हातात घेऊन बंजारा समाजातील स्त्री-पुरुष तरुण-तरुणी एकत्र नाचत-गात संत श्री सेवालाल महाराज सामकी माता व श्रीकृष्ण भक्तीचे गोडवे गातो.
होळी म्हणजे वाईट प्रवृत्तीवर चांगुलपणाचा विजय गोरबंजारा समाज इतर समाजाप्रमाणे मानतो.
होळी हा सण एक यज्ञ आहे . ज्यामध्ये षडविकारांची अर्थात मोह, लोभ, अहंकार, मत्सर, द्वेष वाईट प्रवृत्तीची अहूती दिली जाते.
ईना किंना, पीडा, दुःख,दारिद्र्य ची होळी केली जाते.

होळी हा सण एक संस्कार आहे. निसर्गपूजक व्यापारी गोर बंजारा समाजाच्या मते होळी हा सण ब्रिटिशकालीन बावन प्रशासकीय विभागातील साम्राज्यवाद उखडून काढण्यासाठी तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात आलेला आहे.
याचे वर्णन लोकगीतांमध्ये आलेले आहे…
” भर तलगाळेती बावन
बराडेती आईए काळी ,
होळी रमच सेवालाल ,!!
आरोळी मारच धर्मळीयाडी,
गोर रमचं केसुलारी होळी!!
याडी राधा मार पिचकारी ,
रमतू रमतू राधा हरगी,
बंधन भीजगो सारी,
होळी रमच मारो राम ,

सीता मारी पिचकारी !!
होळी रमचं मारो राम-
लछुमण दांडो काढोरे!!
काकी दादी रिस मत करजो,
हम कोनी बोला,
होळी बोलाचये भांड !!
… काकी, दादी, दादा राग करू नका होळी म्हणते आज भांडण्याचा दिवस आहे.
.. ” दास ईश्वरसिंग बापू केरो,
*गुद चारोळी, लकडीर ठोळी
होळी रमच मारो लाल,
होळी खेलार!!”
निसर्गपूजक गोर बंजारा समाज संत श्री ईश्वरसिंग महाराज यांच्या पुरोगामी शिकवणीनुसार पळसाच्या फुलापासून तयार केलेला रंग वापरतात. गाईगुरांना व कुटुंबाला जडणाऱ्या आजारापासून मुक्ती मिळवून देण्यासाठी निरोगी राहण्यासाठी पळस व लिंबाचा पाला, पाचोळा जाळला जातो
साल, रस, गाईगुरांना व कुटुंबातील व्यक्तींना पाजला जातो.


समाजातील लोक गीत चाली रुढी-परंपरा यांच्यातील विज्ञानवाद आम्ही सण उत्सवातून समजून घेणे प्रासंगिक आहे.
” भारत देसेरो झेंडा फडक जाये ,
बावन बराड फाकिम मलजाये !!
केसुला देशभक्तीरो फगवा
रमलो,
” गोरे लोकुर चाल ओळखलो गोरलाल …
… होळी खेलार !!
जागतिक व्यापारात आपला मोठा सहभाग नोंदविनारा बंजारा समाज ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरण पुढे एकमेव अडसर होता. जागतिक व्यापारात भारताचा 1820 ते 1840 या दरम्यान 33 टक्के वाटा होता. या व्यापारात गाई गुरांच्या पाठीवर लदेनीच्या साह्याने व जगाला दिलेल्या लभानमार्गाने हे बंजारा समाजाने सिंहाचा वाटा उचललेला आहे. जे आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महामार्ग म्हणून सुपरिचित आहेत. अशा विमुक्त जाती भटक्या जमातीवर विविध जंगल कायदे व 1871 चा जन्मजात गुन्हेगारी जमात कायदा लादून त्यांना जन्मजात गुन्हेगार ठरविले होते.

देशातील विमुक्त जाती व भटक्या जमाती व बंजारा समाजाने यामुळे आपले आत्मनिर्भरता गमावली होती. अशा ब्रिटिशांच्या विरोधात बंजारा समाजाला बंदिस्त केलेल्या 52 विभागांना नेस्तनाबूत करण्याचा निश्चय बंजारा समाजाने केला होता. ब्रिटिशांच्या विरोधामध्ये पुकारलेला देशभक्तीपर लढा लोकसाहित्यातून प्रतिबिंबित झालेला आहे.

1857 चे पहिले स्वातंत्र्य समर असो सविनय कायदेभंग चले जाव असो की महात्मा गांधी ने पुकारलेले स्वदेशी आंदोलन, स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास असो की प्राचीन चळवळीचा इतिहास, खालसा पंथाची स्थापना करणारे पंचप्यारे बंजारा, शाहिद मनिशिंह, भगवानदास वढतीया अशो के आठ देशाची मदत घेऊन ब्रह्मदेशातील यंगुनचा सगळ्यात मोठा पायगोडा बांधणारे भगवान बुद्धाचे पहिले अनुयायी तपसु आणि भील्लक बंजारा, लाखो विहिरी व तलाव बांधणारा व्यापारी लकीशहा बंजारा, युद्ध, व्यापार, व्यवसाय देशभक्तीत आपले योगदान देणारा बंजारा , समाज हा ऐक्याऐंन्सी वर्षाच्या गुन्हेगारी जमात कायद्यामुळे व ब्रिटिशांनी गुन्हेगार ठरविला.त्यामुळे तो नेस्तनाबूत झाला.
देशभर जगभर विविध जाती-धर्मात विखुरला गेल्यामुळे त्याचे मूळ अस्तित्व धोक्यात आले आहे.
गोर बोली भाषेचा अभ्यास गिअर्सन यांनी 1897 पूर्वी केला होता. अलीकडच्या काळात बंजारा बोलीभाषेचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

श्रावस्ती बांधणारा आनाथपिडक, जगातील सात देशाच्या राजा व लदेणीकाराची मद्दत घेऊन ब्रह्मदेश यंगुनचा जगातील सर्वात मोठा पागोडा बांधणारे तपसु व भल्लिक,बल्लूराय बिंजरावत, ठाकुरसेन बंजारा, गोदु, लक्खीशाह बल्लुराय मल्लूकी बंजारा, माईदास, रुढीयादास, लाखा लमाणी, हेमाहाडाऊ आदी 52 बिऱ्हाडांनी दुष्काळी परिस्थितीत साह्य केल्याचे आढळून येते.

जागाचा पोशिंदा असणारा गोर बंजारा समाज भाषा, लोकसाहित्य व लोकगीत यामुळे आपले अस्तित्व टिकवून आहे. जगातील सर्वात जास्त ‘लदेणी’व्यापार करुन श्रीमंत असणारी जमात म्हणून गोर बंजारा समाजाची ओळख वसाहतवादाच्या आगमनापूर्वी होती. टी. व्ही. स्टीफनसन यांनी १२ ऑक्टोंबर १८७१ मध्ये जन्मजात गुन्हेगारीचा शिक्का मारुन गोर बंजारा समाजाच्या स्वर्णिम इतिहासाच्या श्रीमंती वर पाणी फिरविले.

गुन्हेगारीच्या कायद्याला लागु करून आता १२ऑक्टोंबर २०२१ ला १५०वर्षे पुर्ण होत आहेत. याचे औचित्य साधून आम्ही व्यापक अर्थाने देशभरातची नव्हे तर जगभर मुळ गुन्हेगारी कायद्यामुळे पिढीत १९८ जमातीच्या संघटनांनी काळा दिवस साजरा करुन अंदाजपत्रकीय तरतुदी व संवैधिनिक मागणीसाठी लढा उभारला पाहिजे.

ब्रिटिश सरकारने आर्थिक साम्राज्यवाद लादले परंतु ओठा व हृदयाचे सौंदर्य हिरावून घेऊ शकले नाहीत. लोकगिताची स्पंदने घराघरात गुजंताना आजही आढळून येतात.

होळी असोकी दसरा – दिवाळी, माझ्या लोकसाहित्याच्या श्रीमंतीला दृष्ट लागू नये. म्हणजे खरे अर्थांनी होळी साजरी केल्याचे सुख व समाधान पदरात पडेल असे वाटते.

संदर्भ .

बंजारानामावली-जिप्शीबंजारा पुर्वी कोण होते? ” हिन्द-ए-रत्न “मल्लुकी बंजारण’*

डॉ अशोक पवार, आ. क.राठोड, बंजारा लोकसाहित्य खंड१-व २, दिल्ली साहित्य अकादमी, हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्डस, राहुल सांस्कृतायन, पिटर मुंडी व ब्रिटिश संसदेततून मिळालेल्या पुराव्याच्या आधारे

Related posts

पशुपक्षी, वनसंपदा अन् माणुसकीला कवटाळणारी भटकंती…

खाऊच्या पानांच्या वेलीची काळजी…

खुषखबर ! शेतकऱ्यांसाठी…

Leave a Comment