December 1, 2023
Book review of Dr Ashok and Sunita Rathod Pawar book
Home » गोरबंजारा समाजाचे बलिदान आणि शौर्याची कहाणी उजागर करणारा अनमोल ग्रंथ
संशोधन आणि तंत्रज्ञान

गोरबंजारा समाजाचे बलिदान आणि शौर्याची कहाणी उजागर करणारा अनमोल ग्रंथ

हिंद -ए. रत्न मल्लुकी बंजारन या ऐतिहासिक दहा खंडामधील प्रथम खंड या आधीच पवार दापंत्यांने लिहुन पुर्ण केला असुन ते प्रंचड गोर साहित्यामध्येच नाही तर हिंदी साहित्य क्षेत्रात प्रंचड धुमाकूळ घालत आहे. प्रसिद्ध प्रतिभावंत साहित्यिक डॉ. अशोक पवार, संचालक वसंतराव नाईक संशोधन तथा प्रशिक्षण केंद्र आणि गोरबंजारा साहित्य संमेलन नागपूरच्या अध्यक्षा तथा प्रसिद्ध प्रतिभावान लेखीका डॉ. सुनिता राठोड -पवार यांनी स्वर्णिम इतिहास मधला दुसरा खंड शहीद -ए-आजम: लक्खीशाह बंजारा हे ग्रंथ लिहिले आहेत. या पुस्तकात 26 प्रकरणे असुन कर्नल जगतारसिंह मुलतानी चंदिगढ यांनी सुंदर प्रस्तावना लिहलेली आहे.

✍️ याडीकार पंजाबराव चव्हाण पुसद 94 21 77 43 72

औरंगाबाद मधील पवार दापंत्य गेल्या 22 वर्षापासून गोरबंजारा समाजातील हजारो संदर्भ गोळा करून बंजारा समाजाचा गौरवशाली इतिहास उजागर करण्यासाठी सतत धडपड करत आहेत. भारत वर्षामध्ये शिख बंजाराचा इतिहास दान, धन, बलिदान आणि शौर्याने भरलेला असून हा गौरवशाली इतिहास या पवार दापंत्यांनी प्रचंड मेहनत करून गोळा केलेला आहे. एवढेच नव्हे तर भारत वर्षात ज्या ज्या महापुरुषांनी योगदान दिलेले आहे. असे सर्व महानुभावांचे अप्रतिम कार्याची शोध घेऊन मांडण्याचा बिडा उचललेला आहे. म्हणून त्यांनी गोरबंजारा स्वर्णीम इतिहास हे जे शीर्षक दिलेले आहे. ते अगदी बरोबर वाटते. हा स्वर्णीम इतिहास एक नव्हे दोन नव्हे तर दहा खंडांमध्ये ते प्रसिद्ध करणार आहेत. असे प्रंचड मोठे काम ते रात्रंदिवस करत आहेत. गोरबंजारा समाजात त्यांच्या सारखे ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण लिखाण दुसऱ्या कोणत्याही लेखकाचे नाही.

पहिल्या खंडामध्ये त्यांनी गोरबंजारा समाजाच्या वंशावळी इसवी सन पूर्व 472 पासूनचा शोध घेतला होता. यासाठी त्यांनी जवळपास 2472 वर्षाचा इतिहास अभ्यासून गोरबंजारा समाजाची वंशावळी उजागर केली होती. ऐवढे मोठे हे ऐतिहासिक कार्य महाराष्ट्रातच नाही. तर संपूर्ण भारतात आतापर्यंत कोणीही केल्याचे अजून तरी दिसत नाही. शहीद-ए-आजम: लक्खीशाह बंजारा खंड दोन मध्ये लक्खीशाह बंजाराचा परिवार आणि बल्लूनायक बंजारा पवार परिवाराचे पारंपारिक संबंध, शिखांच्या ऐतिहासिक इतिहासामध्ये पवार परिवारांचे योगदान तारखेवार उजागर करून संदर्भसूचीसह त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. पवार दापंत्यांच्या मते बंजारा समाज हा प्राथमिक स्वतंत्र जीवनपद्धती जगणारा, निसर्ग पुजक स्वतंत्र समाज होय ! लेखक डॉ. अशोक पवार हे बल्लू नायक पवार बंजारा परिवाराचे वंशज असून त्यांची धर्मपत्नी लेखीका डॉ. सुनिता राठोड- पवार हे गोरबंजारा समाजाचे पहिले इतिहासकार लोकनेते बळीराम पाटील मांडवीकर आणि त्यांचे पुत्र दिवंगत खासदार उत्तमराव राठोड यांच्या नात्यातील आहेत.

बंजारा समाजाचा निसर्ग धर्म त्यांच्या चालीरीती, रुढी, परंपरा आणि त्यांची जीवन जगण्याची कला हे सर्व गुणधर्मामुळे भारतातील हिंदू, बौद्ध, जैन, लोक प्रभावित झाले. यांचा इतिहास प्राचीन असून पणी, अनाथपिंडक- सार्थ वाहक, तपसू-भिल्लक ,मनसुख बंजारा, भगीरथ, बल्लूराय बंजारा, लक्खीशाह बंजारा इत्यादी महान धनी, दानी, उदाहरणासहित डॉ. पवार दापंत्याने या पुस्तकात संदर्भात सहित दिलेली आहे. महात्मा गौतम बुद्ध ते जैन धर्म गुरु यांनी बंजारा तांडा पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी ते अनेक तांड्यात आले होते. यांचा सुद्धा उल्लेख पवार दापंत्यांनी या पुस्तकात संदर्भासहित केलेला आहे. शीख धर्माची स्थापना गुरुनानक देवजी यांनी इसवी सन पंधराव्या शतकामध्ये केली होती. गुरुनानक देवजी शिख धर्माचे प्रचार करण्यासाठी संपूर्ण भारताचा दौरा करत होते. इसवीसन १५०८ मध्ये गुरुनानक देवजी प्रथम यात्रा उदासी ( मिशनरी यात्रा) साठी गेले होते. त्या उदासी यात्रेच्या दरम्यान गुरुनानक देवजी भाई ठाकुर दास (गोधु चे वडील आणि लक्खीशाह बंजाराचे दादा ) यांच्या तांड्यामध्ये ते थांबले होते. तेव्हा गुरुनानक देवजींच्या विचाराने प्रभावित होऊन भाई ठाकूर यांनी शिख धर्म स्वीकारला होता. शिख शब्दांचा अर्थ शिष्य असून तेव्हापासून बंजारा समाजाचे काही परिवार शिख गुरु सोबत जोडले गेले. गोरबंजारा समाजाकडून शिख धर्मा करिता केलेल्या योगदानाचे अभ्यासपूर्ण माहितीचे विवेचन पवार यांनी या खंडामध्ये केलेले आहे .खरोखरच त्यांच्या मेहनतीला जोड नाही. हा खंड वाचताना पानापानावर संदर्भासहित दिलेली माहिती गोळा करणे हे सोपे काम नाही. परंतु हे काम तन ,मन ,धनाने केलेले आहे. हे पानोपाणी दिसून येते.

गुरू ग्रंथसाहेबांमध्ये बंजारा समाजाचे अनेक संदर्भ असून बंजारा मित्र, बनजकार, वनिजा अशा अनेक रूपामध्ये ते लिहिलेले आहे. लक्खीशाह बंजारा यांचा जन्म 4 जुलै 1580 मध्ये दिल्ली येथील रायसिना तांडयामध्ये झाला. लक्खीशाह बंजाराचे दादा ठाकूर आणि पिता गोदूजी हे गुरुनानक देवजींच्या विचारामुळे प्रभावित होऊन त्यांनी त्यावेळी शिख धर्म स्वीकारला होता. आपल्या दादा आणि पितांच्या पावलावर पाऊल ठेवून लक्खीशाह सुद्धा सिख धर्माशी जोडले गेले होते. बाबा लक्खीशाह बंजारा गोरबंजारा समाजाच्या वडतिया गोत्राचे असून काही ठिकाणी लक्खीशाह बंजारा हे लभाना असल्याचा लोकांनी दावा केलेला आहे. गोरबंजारा समाजामध्ये वेगवेगळी नावे असून बंजारा लभाना, गवारिया, बाजीगर अशी अनेक नावे समाविष्ट आहेत. ऐतिहासिक गोष्ट अशी की बाबा लक्खीशाह बंजारा यांनी गुरु तेग बहादुर यांचे पार्थिव शरीर आपल्या घरामध्ये आणून त्यांनी अंतिम संस्कार केले होते. ही घटना डॉ. अशोक पवार यांनी संत कबीरदासचा दोहया मधून विस्तृत प्रमाणात समजावून दिलेली आहे. यावरून पवार यांचे संशोधन आणि लेखन कौशल्य किती मोठे आहे. हे आपल्या लक्षात येईल.

आपण एखादी गोष्ट मनातून करतो. ती गोष्ट अनेकांच्या मनात घर करून जाते. अगदी तशाच प्रकारे लेखक डॉ. अशोक पवार यांनी आपल्या मनातून हे ऐतिहासिक पुस्तक लिहिल्यामुळे वाचकाच्या मनात या पुस्तकाविषयी आपुलकी प्रेम, निर्माण होते. बाबा लक्खीशाह बंजारा यांनी गुरु हर राय साहेबजीचा सल्ला घेऊन त्यांनी लोहगढ किल्ल्याची भव्य निर्मिती केली होती. बाबा लक्खीशाह बंजारा यांनी लदेणीच्या माध्यमातून मुघल राजे आणि सैन्यांना रसद पोहोचण्याचे ते काम करत होते .बाबा लक्खीशाह बंजारा 180 गावांचा मालक होता. एवढेच नव्हे तर बाबा लक्खीशाह बंजारा आशिया खंडाचाच नाही. तर जगातील श्रीमंत व्यापाऱ्यामधील एक व्यापारी होता. म्हणून 17 वी शताब्दी मध्ये भारताचा जीडीपी हा विश्व जीडीपी मध्ये 24.4 टक्के हिस्सा होता. जगातल्या जीडीपी मध्ये भारताचे सर्वाधिक योगदान होण्याचे कारण हे बाबा लक्खीशाह बंजारा आणि बल्लुराव नायक पवार असे मोठे धनिक व्यापारी होते. पवार दापंत्यांचे संशोधन या ठिकाणी खरे वाटते.

जो व्यक्ती लोहगढ सारख्या भव्य किल्ल्याचे निर्माण करतो .तो व्यक्ती आपल्या समाजातील लोकांना धनिक बनवणार नाही. तर काय? त्यामुळेच गोरबंजारा समाजाचा हा भारत वर्षातील स्वर्णीम इतिहास असल्याचे नाकारता येत नाही. बाबा लक्खीशाह बंजारा यांच्याबरोबरच या खंडामध्ये लेखकाने बल्लूराय पवार बंजारा परिवारांचे शौर्याच्याही कहाणीचे सुद्धा या खंडामध्ये उल्लेख केलेला आहे. हा इतिहास शिखांच्या इतिहासामध्ये सुद्धा आलेला असून एका परिवारामधून किती सदस्यांनी युद्धामध्ये भाग घेतला. कोणाच्या विरोधात कोणत्या गुरुने शीख असल्यामुळे आपले शौर्य त्यांनी दाखवले. हा सर्व इतिहास डॉ. पवार दापंत्यांनी या पुस्तकात संदर्भात सहित संशोधन मांडलेला आहे. तो अतुलनीय आणि अभ्यासनीय आहे.

डॉ. अशोक पवार यांनी पुस्तकातील संदर्भांसाठी हिंदी, इंग्रजी सहित अनेक पंजाबी ग्रंथाचे सुद्धा त्यांनी अध्ययन केलेले आहे. एवढेच नव्हे तर बाबा लक्खीशाह बंजारा आणि बल्लू नायक पवार या बंजारा परिवारांचे शौर्य आणि गौरवशाली इतिहास व वंशावळी प्राप्त करण्यासाठी त्यांनी पंजाब तसेच राजस्थान मधील अनेक ठिकाणी भेटी देऊन भाट लोकासोबत चर्चा करून शेकडो ग्रंथाचे वाचन केल्यानंतर त्यांनी या कुटुंबाची वंशावळी प्राप्त करून घेतलेली आहे. यावरून त्यांनी जेम्स-टाड यांनी लिहिलेल्या घुमंतू इतिहासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे कार्य डॉ. पवार दापंत्य करीत आहे. असे प्रसिद्ध भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी कथन केलेले आहे. ते खरेही आहे. पवार दांपत्याने बल्लू नायक पवार बंजारांची जी वंशावळी या पुस्तकांमध्ये दाखवलेली आहे. ती इसवी सन पूर्व 472 बंजारा समाजाचे मालवातिल आदित्य पवार यांनी पवार वशांची स्थापना केली होती. त्याच परिवारातील धुमराज पासून ते मणिसिंह बंजाराचा नातु पर्यंत वंशावळींचा इतिहास त्यांनी उजागर केलेला आहे. पवार वंशाचे राजा विक्रमादित्य, संतला पवार, राजाभाऊ पवार यांनी मालवामध्ये राज्य केले होते. या सर्व गोष्टी संक्षिप्त रूपामध्ये ज्ञानी गर्जासिंह यांनी शहीद विलास या पुस्तकात केलेली आहे. जे पंजाबी भाषांमध्ये आजही लिखित आहे. पवार यांनी पंजाबी, मोडी फारसी ,भाषांचे अभ्यासक नसतानाही त्या सर्व संदर्भांचे भाषांतर करून हे पुस्तक हिंदीमध्ये निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न हा खरोखरच अभिनंदन आहे.

इसवी सन 1305 मध्ये मालवा पवार बंजारांचा राज्य खिलजीकडे गेला. तेव्हा पवार बंजारा वंश आपले स्वतंत्र अस्तित्व राज्य स्थापन करण्याकरिता बाहेर निघाले होते. याची संपूर्ण कथा पवार यांनी प्राचीन शीला लेखांच्या आधारावर मांडली आहे. मुलतान राज्यामध्ये राज्य करणारा राव मुलांचा पुत्र बलुराव नायक होता. हेच ते बलुराव नायक आहेत. जे शिख संप्रदायाच्या बरोबर शिख बनले होते. त्यांनी गुरु अमरदास, गुरु रामदास, गुरु अर्जुन देव आणि गुरु हरगोविंदजी यांच्या बरोबर पावलावर पाऊल ठेवून त्यांना नियमित मदत केली. लाहोर मध्ये 24 जून 1734 मध्ये बल्लुराव पवार बंजारा यांचे वंशज मणिसिंह परिवाराबरोबर शहिद झाले होते. सिंह म्हणजे गुरु गोविंदसिंग चे सर्वात लाडके गुरु शिष्य होते. गुरु मणिसिंह यांना हरीमंदिर साहब येथील देखभाल ,नियंत्रण आणि पूजा पाठ सोपविण्यात आला होता. म्हणून मणिसिंह यांनी गुरुबानी की सत्यप्रत तयार करण्याचे महान कार्य केले होते. मणिसिंह यांचे पुत्र पत्नी त्यांचे सोबती आणि त्यांच्या नातूसहित आणि अनेक महिलांना इस्लाम धर्म न कबूल केल्यामुळे लाहोर येथे जकरिया खान यांनी शहीद करून टाकले होते. यामध्ये मणिसिंह यांचे तुकडे तुकडे करण्यात आले होते. यांचे लिखाण या पुस्तकांमधील अरदासमध्ये करण्यात आलेलं आहे.

मणिसिंह बाबा लक्खीशाह बंजारा यांचे जावई होते. मणिसिंह बंजाराचा विवाह बाबा लक्खीशाह की पुत्री माता सितो यांच्यासोबत झाला होता. माता सीतो यांचे नाव शीख इतिहासमध्ये माता गुजरी यांच्यानंतर आलेला आहे. माता सीतो यांनी दीक्षा झाल्यानंतर त्यांनी आपले नाव बदलून माता वसंत कौर ठेवले होते. 24 जून 1734 मध्ये माता वसंत कौर या शहीद झाल्या होत्या. या पुस्तकांमध्ये डॉ. अशोक पवार यांनी बाबा लक्खीशाह बंजारा परिवारांचे आठ आणि बल्लू नायक पवार बंजारांचे 64 गुळ मिळवून 72 शहीद झालेल्या महान लोकांचे वर्णन केले आहे. बाबा लक्खीशाह बंजारा आणि बल्लू नायक परिवार हे बेपारीच्या नात्यामुळे त्यांचे पारिवारिक संबंध आले होते. बल्लू नायक यांचा पोता नातू मणिसिंह यांचा विवाह बाबा लक्खीशाह बंजारा यांची मुलगी माता सितो यांच्यासोबत विवाह झाला होता. पवार दापंत्यांनी 22 वर्षाच्या संशोधनाच्या आधारावर जवळपास मागील दोनशे वर्षाच्या अंतराने बाबा लक्खीशाह बंजारा आणि बलुराव पवार बंजारा यांच्या परिवाराकडून झालेल्या एकूण 72 शहीद वीर पुत्रांच्या गौरवशाली इतिहास या दुसरा खंडामध्ये मांडण्याचे फार मोठे काम केलेले आहे.

पुस्तकाचे नाव – शहीद- ए- अजम: लक्खीशाह बंजारा !
प्रकाशक – आकांक्षा बंजारा ग्लोबल पब्लिकेशन औरंगाबाद
किंमत – पाचशे रुपये
पृष्ठे – 364

Related posts

झाडीबोली साहित्य मंडळांचे राज्य स्तरीय साहित्य पुरस्कार घोषित

देशा बाहेर जाणारा पैसा रोखण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन

मनाच्या योग्य स्थितीतच बीजाची पेरणी फलदायी ठरते

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More